कामठीत नाविन्यपूर्ण सार्वजनिक शौचालयाचे वाजताहेत तीनतेरा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

राष्ट्रपती हस्ते पुरस्कारित कामठी शहरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था

कामठी :- केंद्र शासनाने 2 ऑक्टोबर 2014 रोजी राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्या जयंतिदिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती दिनी म्हणजे 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देश स्वच्छ करण्याचा संकल्प करीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला याच अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुद्धा राबविण्याचा संकल्प करीत गाव स्वच्छ तर नागरिक स्वस्थ या अभियान अंतर्गत कामठी नगर परिषद च्या वतीने मे 2015 पासून शौचालय योजनेची सुरुवात करण्यात आली. यानुसार नागरिकांच्या सोयीसाठी वयक्तिक शौचालय तसेच सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले. तसेच 14 व्या वित्त आयोग योजने अंतर्गत जवळपास 30 लक्ष रुपयाच्या निधीतून मागील एक वर्षात कामठी शहरातील जवळपास पाच ठिकाणी नाविन्यपूर्ण सुलभ शौचालय उभारण्यात आले.

मात्र हे शौचालय नागरिकांच्या उपयोगासाठी सुरू करणयात न आल्याने लाखो रुपयाच्या शासकीय निधीतून नवनिर्मित करण्यात आलेले हे शौचालय अनुपयोगी ठरत असून शौचालयाची दुरावस्था होत आहे. तर कामठी नगर परिषदच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सार्वजनिक शौचालय योजनेचे तीनतेरा वाजले असून खुद्द कामठी नगर परिषद प्रशासनाकडूनच शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्यात येत आहे. तर स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत कामठी नगर परिषदने राज्यात 11 वे स्थान पटकाविले होते. तर कामठी नगर परिषद ची उत्तम कामगिरी व प्रभावी अंमलबजावणीमुळे केंद्र शासनाच्या वतीने कामठी नगर परिषद ला दिल्ली येथे राष्ट्रपती च्या हस्ते थ्री स्टार मानांकन ने पुरस्कारीत करण्यात आले होते तर पुरस्कार प्राप्त होऊन एक वर्षाचाही कालावधी लोटत नाही अशा राष्ट्रपती हस्ते पुरस्कारीत कामठी शहरात सार्वजनिक शौचालयाची दुरावस्थेचा प्रकार दिसून येणे ही एक शोकांतिकाच मानावी लागेल.

नागरिकांनी उघड्यावर शौचविधी ला जाऊ नये व कामठी शहर हागणदारीमुक्त व्हावे या मुख्य उद्देशाने कामठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना वयक्तिक शौचालय ची सोय करून देण्यात आली तसेच अतिशयोक्ती असलेल्या अशा पासीपुरा मैदान,पाणी टंकी जवळ,नया गोदाम, नया बाजार, सैलाब नगर या पाच ठिकाणी 14 व्या वित्त आयोग योजनेच्या जवळपास प्रति सार्वजनिक शौचालय बांधकाम 30 लक्ष रुपये च्या निधीतून करण्यात आले. या पाच ही ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात आलेले सार्वजनिक शौचालय नागरिकांच्या उपयोगात येण्यास सुसज्ज होते.

हे बांधकाम करून एक वर्षे जवळपासचा कालावधी होत आहे मात्र हे नागरिकांच्या उपयोगी नसल्याने या नाविन्यपूर्ण शौचालय ची दुरावस्था झालेली आहे. येथील सैलाब नगर जवळील सर्वजनिक शौचालय ची पाहणी केली असता या शौचालय इमारतीला भेगा पडलेल्या आहेत, स्टील रेलिंग तुटलेली आहेत, सेफ्टी टॅंक फुटलेली आहे , अशा विविध प्रकारच्या दुरावस्था दिसून येतात. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या धम्मचक्र प्रवर्तन ,दसरा निमित्त दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी देशाच्या कोण्या कोपऱ्यातून येणारे नागरिक हे जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देणार आहेत. अशा गर्दीच्या वेळी नागरिकांच्या शौचविधी साठी नवनिर्मित असलेले हे सार्वजनिक शौचालय नागरिकांच्या उपयोगी येऊ शकते तेव्हा कामठी नगर परिषद प्रशासनाने सदर दुरावस्थेत असलेल्या सार्वजनिक शौचालयाची डागडुजी सुव्यवस्था करून नागरिकांच्या उपयोगात आणावे अशी मागणी जोर धरत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com