चना खरेदीसाठी जिल्ह्यात सात खरेदी केंद्रे

यवतमाळ :- आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत चना खरेदीसाठी जिल्ह्यातील महागाव, पांढरकवडा, झरी जामणी, पुसद, आर्णी, दिग्रस, बाभुळगांव या सात तालुक्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी खरेदी केंद्रावर दि.28 मार्च ते 25 जून पर्यंत सुरु राहणार आहे.

खरेदी केंद्रांमध्ये तालुका खरेदी विक्री समिती महागांव, तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी, दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस, बाभुळगांव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती, बाभुळगांव या केंद्रांचा समावेश आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील चना खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी दि.28 मार्च पासून करण्यात येत असून प्रत्यक्षात चना खरेदी दि. 28 मार्च ते 25 जूनपर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आधारकार्ड, सातबारा उतारा, पिकपेरा व बँके पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर देवून चणा खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी केले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुलभूत कर्तव्ये या विषयावर कायदेविषयक शिबीर

Sat May 4 , 2024
यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी चिकित्सालय, अमोलकचंद विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुलभुत कर्तव्ये या विषयावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मुनोत होते तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार होते. प्रमुख वक्ते म्हणुन अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com