मुथूट फायनान्स ग्रुपच्या सीएआर फंडातून ZP इसासनी शाळेत कम्प्युटर लॅबचे बांधकाम यशस्वी.

नागपूर :- मुथूट फायनान्स ग्रुपच्या सीएसआर फंडातून जिल्हा परिषद शाळा इसासनी येथे कंप्यूटर लॅब बांधून देण्यात आली. त्याचे उद्घाटन मधुप गोर रीजनल मॅनेजर मुथूट फायनान्स यांनी केले. मधुप यांनी उद्घाटन प्रसंगी संबोधित केले. 21 व्या शतकात संगणकाचे महत्व आणि आपल्या शाळेतील मुलं कुठेही कमी पडायला नको यासाठी कम्प्युटर लॅबचे बांधकाम करण्यात आले. असे त्यांनी यावेळी सांगितले. हे सर्व घडवून आणण्यात सोनू कुमार सी एस आर मॅनेजर मुथूट फायनान्स यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे अभिनंदन त्यांनी केले. याप्रसंगी मुथूट फायनान्सचे राहुल खैरकर असिस्टंट मॅनेजर, फायनान्स आशिष अडाळकर असिस्टंट मॅनेजर मार्केटिंग उपस्थित होते. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटच्या रोहिणी भालेराव, संदीप देऊळकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आसरे, पायल निंबाळकर यांनी अथक प्रयत्न केले. संपूर्ण कार्यक्रमाला राजेश मानवीय यांचे मार्गदर्शन लाभले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com