अखेर बावनकुळेच्या मध्यस्थीने कांद्री येथील पीडितेला मिडाला न्याय…

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कांद्री कन्हान : 28 ऑगस्ट 2023 ला कोळसा खाणितील दगाणीने कांद्री येथील घरकोसळून मृत्यू पावलेल्या 32 वर्षीय कमलेश कोठेकर व 6 वर्षीय यादवी कोठेकरच्या परिवारात मृत कमलेशच्या पत्नीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्तीने त्वरित न्याय मिळाला.

घटनेच्या अगदी 15 दिवसांच्या आत चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्तीने वेकोलीच्या(wcl) जवाहर हॉस्पिटल कांद्री कन्हान येथे कंत्राटी कामगार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याकरिता कांद्री शहर अध्यक्ष यांच्या पत्रावर प्रथम जिल्हाधिकारी कार्यालय येथे व नंतर Wcl च्या जनरल मॅनेजर यांच्याशी बैठक घेऊन पीडित महिलेला त्वरित नौकरी वर लावून द्यावे असे सांगितले.

त्यावरून आज दिनांक 11 सप्टेंबर ला पीडितेला कंत्राटी पदावर घेण्यात आले त्या बैठकीत प्रामुख्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे, डी मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार, wcl जनरल मैनेजर, रिंकेश चवरे जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी, योगेश वाड़ीभस्मे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी, गुरुदेव चकोले अध्यक्ष भारतीय जनता पार्टी कांद्री शहर, शिवाजी चकोले माजी ग्रामपंचायत सदस्य, अजय शेंदरे, उमेश कुंभलकर, ऊषा कमलेश कोठेकर, कला साखरकर, सुनीता पापडकर, योगेश्वरी इंगळे, दुर्गेश सावतकर, केशव कोठेकर, प्रवीन साखरकर, दीपक पापडकर, किशोर मनपिया, रूपेश तईकर, प्रतीक्षा चवरे, उपस्थित होते.

Next Post

56 हजार प्रकरणांचा तडजोडीने निकाल, राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

Mon Sep 11 , 2023
Ø 143 कोटी रुपयांचे दावे निकाली Ø 23 कुटूंबांचे मनोमिलन, 153 अपघात दाव्यांमध्ये तडजोड, 80 कोटीची कर्जवसूली नागपूर :-  राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 56 हजार 831 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांचे एकुण तडजोड मुल्य 143 कोटी रुपये आहे. जिल्हा न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, कर्ज वसूली न्यायाधीकरण, सहकार न्यायालय, औद्योगिक व कामगार न्यायालय आणि जिल्ह्यातील सर्व तालूका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतचे […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com