सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा

– चिमुकल्यांनी वाढवलेली १०० रोपटे आजी-आजोबांना भेट

यवतमाळ :- समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंडळ यवतमाळचे अध्यक्ष राजन टोंगो होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे प्रचारक वसंत बेडेकर, माजी प्राचार्य तथा अभिषेक मेमोरियल फाऊंडेशनच्या सचिन डॉ.सुप्रभा यादगिरवार, पोलिस अधिकारी प्रकाश देशमुख, डॉ.अर्चना गाडे पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी टोंगो यांनी अध्यक्षीय मनोगतात ज्येष्ठ नागरिक व युवकांना मोलाचे संदेश दिले. बेडेकर यांनी दैनंदिन जीवनात योग व योगाचे महत्व याबाबत माहिती दिली. डॉ.यादगिरवार यांनी माता पिता व ज्येष्ठ नगारिकांचे चरितार्थ व कल्याणासाठी कायदा 2007, ज्येष्ठ नागरिकांसाठी भारतीय संविधानात असलेल्या तरतूदी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील कायदांची माहिती दिली.

पोलिस विभागाचे देशमुख यांनी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षाविषयक मदत लागल्यास पोलिस हेल्पलाईन क्रमांक १०० वर संपर्क करण्याचे आवाहन केले. डॉ.अर्चना गाडे पाटील व संतकृपा नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तसेच आवश्यक सहाय्याकरिता कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी प्रयास संस्थेचे सुधीर घोरगडे व सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चिमुकल्यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लावलेली व आता मोठी झालेली १०० रोपटे उपस्थित आजी-आजोबांना अनमोल भेट म्हणून देण्यात आली.

प्रास्ताविकात विशेष समाज कल्याण अधिकारी ज्योत्स्ना तिजारे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी समाज कल्याणमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.कमलदास राठोड यांनी केले. आभार समाज कल्याण निरीक्षक मिनाक्षी मोटघरे यांनी मानले. कार्यक्रमाचा शेवट ज्येष्ठ नागरिकांसंबंधीची प्रतीज्ञा घेवून करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिषेक फाऊंडेशनच्या ठाकरे, समाज कल्याण कार्यालयातील निता महल्ले, अमीत कापसे, गौरव गावंडे श्याम लांडोळे, सुहास मोरे, अजय गेडाम, वैशाली रामटेके, योगिता व्यवहारे, प्रज्वला ढोकणे, राजू टप्पे, प्रशांत साठे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक तसेच विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहांचे गृहपाल व नागरिक उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आधार प्रमाणिकरण केलेल्या 829 शेतकऱ्यांना 3 कोटी 52 लाखाचे प्रोत्साहन

Thu Oct 3 , 2024
– महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यवतमाळ :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले नसल्याने ते लाभापासून वंचित होते. शासनाने अशा शेतकऱ्यांसाठी विशेष मोहिम राबविली. मोहिमे दरम्यान मागिल महिन्यात प्रमाणिकरण झालेल्या जिल्ह्यातील 829 शेतकऱ्यांच्या खात्यात 3 कोटी 52 लाखाची प्रोत्साहन रक्कम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com