नागपूर :- पोलीस आयुक्त नागपुर शहर हे आज दिनांक ३१.०३.२०२४ चे १२.०० वा, नागपुर पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित पोलीस भवन येथील ऑडीटोरीयम हॉल येथे सेवानिवृत्त होणारे पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे निरोप समारंभ कार्यक्रमाकरीता स्वतः आवर्जुन उपस्थित राहीले, सेवानिवृत्त होणारे १४ अधिकारी आणि अंमलदार यांना सह पत्नी परीवारासह पोलीस आयुक्त यांनी भावपुर्ण निरोप दिला. याक्षणी पोलीस आयुक्त यांनी सर्व सेवानिवृत्त होणारे अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या पुढील आयुष्याकरीता शुभेच्छा देवुन त्यांनी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सदृढ राहावे तसेच, सेवानिवृत्तीचा मिळणारा आर्थिक लाभांश काळजीपुर्वक गुंतवणुक करण्याचा मोलाचा सल्ला दिला. व त्यांना निवृत्ती वेतन व ईतर सेवानिवृत्तीचे लाभ लवकरात लवकर देण्याचे आश्वासन दिले.
पोलीस आयुक्त यांनी स्वतः निरोप समारंभ कार्यक्रमाकरीता उपस्थित राहुन घेतलेली दखल व त्यांच्या हस्ते मिळालेले स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र हा एक आठवणीचा क्षण त्यांच्या या निरोप समारंभात राहीला. अशाप्रकारची भावना सर्व सेवानिवृत्त अधिकारी, अंमलदार यांनी व्यक्त केली. पोलीस आयुक्तालयातील निरोप समारंभात होणाऱ्या या बदलाबाबत सर्वांनी पोलीस आयुक्त यांचे आभार मानले.
सदर कार्यकमा करीता डॉ. रविन्द्र सिंघल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, पोलीस उप आयुक्त परि क. १. २. ३, ५ तसेच पोलीस उप आयुक्त पोलीस मुख्यालय तसेच सहा. पोलीस आयुक्त मुख्यालय, मोटर परिवहन विभाग, नियंत्रण कक्ष, कोतवाली, सोनेगाव, लकडगंज, आर्थिक गुन्हेशाखा, सदर, जरीपटका, सिताबर्डी व संबंधीत पोलीस ठाणे कपिलनगर, राणाप्रतापनगर, लकडगंज, मानकापूर, सदर, तहसिल, जरीनटका, सिताबर्डी चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक तसेच राखीव पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक प्रशासन, आर्थिक गुन्हेशाखा, नियंत्रण कक्ष चे पोलीस निरीक्षक हे हजर होते.
तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलीस निरीक्षक, मानव संसाधन नागपूर शहर व त्यांचे अंमलदार यांनी केले,