गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) दिनांक 21 फरवरी 2023 ते दिनांक 21 मार्च 2023 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी)दिनांक 02 मार्च 2023 ते दिनांक 25 मार्च 2023 या कालावधीत जिल्ह्यातील विविध परिक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आलेली आहे. परीक्षा संचालन सुयोग्य प्रकारे व्हावे व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नयेत. परीक्षा कालावधीत विवक्षीत कृती करण्यापासून परावृत्त करणे तसेच शांतता तथा सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक आहे. जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन परिक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरात पुढीलप्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात येत आहे. परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती परीक्षार्थी व परिक्षेसी संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही. परिक्षा केंद्राचे परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही.

100 मिटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, सायबर कॅफे, झेरॉक्स सेंटर,फॅक्स केंद्र,पानपट्टी,टायपिंग सेंटर, एस टी डी बुथ,ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे परिक्षा सुरु होण्यापुर्वी दोन तास व परीक्षा सुरु असण्याचा संपुर्ण कालावधीत बंद राहतील.परिक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन,फॅक्स,ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.कोणत्याही व्यक्तीकडून परिक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस/वाहनास प्रवेशास मनाई राहील. परिक्षा केंद्राचे परिसरात परिक्षेच्या कालावधीत ध्वनी प्रदुषणामुळे परिक्षार्थिंना त्रास होईल असे कृत्य करु नये.

सदर आदेश परिक्षा केद्रावर काम करणारे अधिकारी,कर्मचारी, परीक्षार्थी,निगराणी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेबाबत त्याचे परिक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागु राहणार नाही. तसेच हे आदेश दिनांक 21 फरवरी 2023 ते 25 मार्च 2023 रोजी पर्यत परिक्षा सुरु होण्याचे 1 तास अगोदर व परीक्षा संपल्यानंतर 1 तासापर्यत परीक्षेच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व संबंधित परीक्षा केंद्राचे ठिकाणी लागू राहतील असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय निवडणूक आयोगाने 'घराणेशाही' मोडीस काढली - हेमंत पाटील

Sat Feb 18 , 2023
-उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावर आयएसी अध्यक्षांची टीका मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षासंदर्भात ऐतिहासिक निकाला दिला आहे.या निकालानंतर पक्षातील ठाकरे घराण्याची घराणेशाही,वर्चस्व मोडीस निघाले आहे.केवळ भाषण, आरोप-प्रत्यारोप आणि भावनिक आवाहन करून पक्ष चालत नाही. नेतृत्व करण्याची क्षमता, संघटन कौशल्य आणि विशेष म्हणजे पक्षाचा विश्वास नेतृत्वावर असणे आवश्यक आहे, असा टोला इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!