आसन – आशय

आसनांचे अनेक प्रकार आहेत परंतु सर्वसाधारण व्यक्तिच्या दृष्टिने सर्वच आसने दरदरोज करणे अशक्य आणि अनावश्यक आहे. भोजनासाठी अनेक प्रकारचे पदार्थ उपलब्ध असूनही आपण दररोजच्या भोजनांत काही स्वास्थप्रद पदार्थांचाच अंतर्भाव करतो. त्याचप्रमाणे शरीरास स्वस्थ ठेवण्यासाठी आसने केली जातात. स्वस्थ शरीर म्हणजेच निरोगी आणि कार्यसामर्थ्य प्रवण शरीर. ‘स्वस्थ’ शब्द दोन उपशब्दांपासून बनलेला आहे. ‘स्व’ आणि ‘स्थ’, ‘स्व’ म्हणजे स्वतःचे अथवा प्राकृतिक आणि ‘स्थ’ म्हणजे त्या अवस्थेत राहणारा.

प्रत्येक जीवाची प्राकृतिक अवस्था ‘स्वस्थ’ म्हणजेच शुद्ध आणि सामर्थ्यशील असते. प्रवासाचे उपकरण वाहन आहे किंवा वीजेचे उपकरण अनेक प्रकारची यंत्रे आहेत त्याचप्रमाणे शरीर है जीवाचे उपकरण आहे. जीवाची शुद्धता आणि परमात्मस्वरुपः सामर्थ्यसंपन्नता राहण्यासाठी जीवाचे उपकरण शरीर अति प्राकृतिक-निरोगी, शुद्ध, आणि सामर्थ्यसंपन्न राहणे आवश्यक आहे. व्यायामामुळे शरीर शक्तिसंपन्न बनते परंतु ते मर्यादित काळासाठीच. बरेचसे शक्तिसंपन्न मल्ल (पहेलवान) वृद्धापकाळी अस्वस्थ आणि रोगांनी जर्जर झालेले दिसून येतात. त्याचप्रमाणे हे सुद्धा दिसून येते की अधिकांश मल्ल व पुष्ट शरीर कमावलेल्या व्यक्ति अहंकार युक्त असतात आणि अन्य व्यक्तिंवर आक्रमण करुन स्वतःच्या क्षुद्र मनाचे प्रदर्शन करतात. अशा सामर्थ्यवान शरीराच्या व्यक्ति समाजाचे संतुलन बिघडवून मानवास पशुसमान बनवितात.

उत्क्रांतीवादामध्ये आज मानव शरीर सर्वात उच्च मानले जाते. सर्व प्राणिमात्रांच्या शरीरांत प्रमुख पोट आहे आणि चलन वलन करण्यासाठी पाय आहेत. स्वतःचे पोट भरण्यासाठी पशुपक्षी दिवस रात्र खात राहतात. केवळ उदर भरण करण्यासाठी – पोट भरण्यासाठी पशुपक्षांना उत्क्रांत मेंदूची आवश्यकता नसल्याने त्यांचा मेंदू लहान असतो आणि त्याच्या तुलनेत पोट मोठे असते. इतर प्राणिमात्रांच्या तुलनेत मात्र मानवाचे पोट सर्वाधिक लहान असून मेंदू सर्वाधिक मोठा आहे. एवढा मोठा हत्ती परंतु मनुष्याच्या तुलनेत त्याचा मेंदू लहान असतो. – अर्थ हाच की प्रकृतीने उत्क्रांतिद्वारा मानव शरीर अशा करिता निर्माण केले आहे की मानवाने प्रकृतीतून पोटासाठी सर्वात कमी घ्यावे आणि बुद्धिद्वारे विश्वाचा विचार करुन विश्व कल्याणाचा प्रयत्न करावा. आसन हा शब्दप्रयोग म्हणूनच जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. ‘वैदिक’ म्हणजेच ज्ञानमय परंपरेत प्रत्येक शब्दप्रयोग हा पूर्ण विचाराने केला जातो. संस्कृत भाषा ही एक पूर्ण आणि शास्त्रीय भाषा आहे. चांगले – सुसंस्कार करणारी भाषा ह्या अर्थानेच “संस्कृत” हे नामाभिधान करण्यात आले आहे. संस्कृत म्हणजे सुसंस्कारीत आणि पूर्ण भाषा. इंग्रजीत जगाला वर्ल्ड, उर्दुत दुनिया म्हटले जाते परंतु “वर्ल्ड” आणि ” दुनिया’ या शब्दांचा आन्तररिक आशय त्या-त्या भाषेचे भाष्यकार सांगू शकत नाहीत. विचारल्यावर वर्ल्ड म्हणजे हे जग, दुनिया म्हणजे ही दुनिया या प्रमाणे इतरांना सांगून चूप करतील. संस्कृतमध्ये जगाला “संसार” किंवा “जगत” म्हणून संबोधिले जाते. संसार कशास म्हणतात?

“संसरति इति संसार”

जे नेहमी सरकत राहते, गतिमान आहे त्याला संसार असे म्हटले जाते. संस्कृत भाषेत शब्दांमध्ये शब्द असतात, आशयात आशय असतो. “आसन” शब्दामध्ये दोन उपशब्द आहेत एक “आ” आणि दुसरा “सन” म्हणजे पुढे जाणे. आसन करतेवेळी आपण स्वस्थानावरच असतो. मग आपण पुढे कोठे जातो ?

वैदिक परंपरेत सर्व क्रिया आणि विद्या यांचा अंतिम उद्देश ज्ञान प्राप्ति अथवा मुक्ति आहे. “सा विद्या या विमुक्तये”. आसनांच्या द्वारेही आपल्याला ज्ञानप्राप्ति आणि मुक्ति मिळवायची आहे. शुद्ध प्राकृतिक शरीराद्वारे शुद्ध-प्राकृतिक मनाचे उन्नयन होते आणि शुद्ध उन्नयनित मन राहिल्याने ज्ञानप्राप्ति होते. आसनांचे फळ निरोगी शुद्ध शरीर आणि सामर्थ्यशील मन हे आहे, म्हणून “आत्मज्ञान” हा आसनांचा उद्देश आहे. शरीर स्वस्थ आणि निरोगी करणे एवढाच आसने करण्याचा उद्देश नाही तर शुद्ध सामर्थ्यवान शरीराद्वारे मनालाही शुद्ध आणि सामर्थ्यसंपन्न बनवून आत्मज्ञानाची प्राप्ति करणे हा उद्देश्य आहे, हे आसनप्रेमींनी जाणावे. केवळ निरोगी शरीर बनविण्यासाठी आसन करणे म्हणजे आसन प्रक्रियांवर अन्याय करणे ही जाणीव योगमार्गीयांनी ठेवावी.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शस्त्र बाळगणारा अल्पवयिन मुलावर कारवाई 

Sat Jun 22 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- पेलीस स्टेशन अंतर्गत कोळसा खदान नंबर सहा येथे हातात धारदार शस्त्र बाळगुण दहशत पसरविणाऱ्या विधिसंघर्ष बालकास पोलीसांनी पकडुन शस्त्र जप्त करुन कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहिती नुसार, गुरुवार (दि.२०) जुन सायंकाळी ४ वाजता दरम्यान कन्हान पोस्टे चे सपोनि राहुल चव्हाण, हरिष सोनभद्रे, अमोल नागरे, संदीप गेडाम आदि पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करित असताना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com