– लायन्स क्लब सावनेरचा उपक्रम
सावनेर :- दिवाळीचा सण आणि वृद्धाश्रमातील नागरिकांच्या आकांक्षा याचे भान राखत स्थानिक लायन्स क्लब तर्फे नुकतेच स्नेहमीलन व मदत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. विलास डोईफोडे, अध्यक्ष लायन्स क्लब यांनी भूषविले. रिजन चेअरपर्सन वासू ठाकरे, झोन डॉ. रवींद्र हुसूकले प्रमुख पाहुणे, तर मार्गदर्शक विलास बांगरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि पियुष झिंजूवाडिया यांच्या ध्वज वंदनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास डोईफोडे, अहवाल वाचन सचिव रुकेश मुसळे, कोषाध्यक्ष हितेश ठक्कर यांनी केले.
भविष्यात वृद्धाश्रमांची गरज पडू नये आणि संयुक्त कुटुंब पद्धती वाढावी असे प्रतिपादन वासू ठाकरे यांनी केले. डॉ. हुसूकले यांनी समाजातील सक्षम घटका तर्फे सेवाभाव वृद्धिंगत व्हावा असे आवाहन केले तसेच क्लबच्या उपक्रमांची मुक्त्कंठाणे प्रसंशा केली. या प्रसंगी सेवासप्ताहातील योगदानाबद्दल ऍड. मनोजकुमार खंगारे, डॉ. प्रवीण चव्हाण आणि शशांक देशमुख यांना गौरविण्यात आले.
यावेळी लायन्स क्लब च्या वतीने सर्व वृद्धान्ना मिठाई, फळे व पादत्रानांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन किशोर सावल तर आभारप्रदर्शन ऍड. अभिषेक मुलमुले यांनी केले. कार्यक्रमात चार्टर प्रेसिडेंट वत्सल बांगरे, डॉ. परेश झोपे, प्रवीण टोणपे, हितेश पटेल, सुशांत घटे, प्रफुल्ल चंदनबाटावे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. शिवम पुनियानी, डॉ. अमित बाहेती, मिथिलेश बालाखे, प्रवीण सावल, मनोजकुमार पटेल, रुपेश जिवतोडे यांचे सहकार्य लाभले.