रेल्वे चोरीचे साहित्य खरेदी करणाऱ्या भंगार व्यवसायिकास अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक कामठी रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रेल्वे सुरक्षा बल चौकी कामठी ,दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कामठी रेल्वे स्टेशन च्या यार्ड मध्ये उभे असलेले रेल्वे इंजीन ला बांधून असलेल्या लोखंडी साखळी चोरी करायला अल्पवयीन चोरट्याना पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता या चोरीचा गुन्हा कबूल करीत हे चोरीचे साहित्य भंगार व्यवसायिकास विकत असल्याचे सांगताच पोलिसांनी या भंगार विक्रेत्यास ताब्यात घेत त्याविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करून नागपूर रेल्वे न्यायालयात सादर करण्यात आले.

आरोपी भंगार व्यवसायिकाचे नाव शिशुपाल नरेश गेडाम वय 32 वर्षे रा भीमनगर कामठी असे आहे .या आरोपी कडून चोरीस गेलेली 14 किलो वजनाची 12 फूट लांब 2491.72 रुपये किमतीची लोखंडी साखळी जप्त करण्यात आली. उल्लेखनीय आहे की कामठी रेल्वे स्टेशन यार्ड मध्ये उभ्या असलेल्या रेल्वे गाडीच्या इंजिन ला सुरक्षेच्या दृष्टीने लोखंडी साखळी ने बांधलेले असते मात्र मागील काही दिवसापासून अज्ञात चोरट्याकडून ही लोखंडी साखळी चोरी होत असल्याचे प्रकरण चौकी कामठी प्रभारी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एस के मरावी यांच्या निदर्शनास येताच या चोरट्यांचा शोध लावण्याहेतु योजनाबद्ध पद्धतीने चोरट्यावर नजर ठेवून असलेल्या पोलिसांना यशप्राप्त झाले दरम्यान 5 ऑगस्ट ला 10 जुलै 2023 ला कामठी रेल्वे यार्ड मधून लोखंडी साखळी चोरी करणारे दोन अल्पवयीन आरोपी अटक करण्यात आले.तदनंतर या भंगार व्यवसायिकास अटक करण्यात आले.

ही यशस्वी कारवाही रेल्वे सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त एस डी देशपांडे यांच्या मार्गदर्शनार्थ रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एस के मरावी,अरुण थोरात,आर के श्रेष्ठ,ओ एस चौहान,नागपूर मंडळ चे गुन्हे निरीक्षक नंदबहादूर,उपनिरीक्षक विनेक मेश्राम,एस एस शेडाम यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

उमरेड क्षेत्र में एचएमएस (HMS) संगठन की फिर टूटी कमर ,लगा बड़ा झटका

Sun Aug 6 , 2023
उमरेड :- शनिवार दिनांक 5 अगस्त 2023 को डब्ल्यूसीएल के उमरेड क्षेत्र में भारतीय मजदूर संघ ने एचएमएस (HMS) संगठन को बड़ा झटका दिया. आशीष मूर्तिजी संचलन समिति सदस्य वेकोली, जयंत आशोले जेबीसीआई सदास्य, ए.पी.सिंह आईआर प्रभारी, सुरेश पाटिल अध्यक्ष भारतीय कोयला खदान मजदूर संघ नागपुर -उमरेड, वेकोलि मुख्यालय के महामन्त्री कृणाल देशमुख, कौस्तुभ सज्जनपवार, उमरेड के क्षेत्रीय अध्यक्ष संजय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com