गुरुवारी जिल्ह्यात शून्य कोरोना पॉझिटिव्ह

–  रुग्ण डिस्चार्ज 00, एकूण डिस्चार्ज 58969, एकूण पॉझिटिव्ह 60104, क्रियाशील रुग्ण 02, आज मृत्यू शून्य, एकूण मृत्यू 1133,रिकव्हरी रेट 98.11 टक्के,मृत्यू दर 01.89,आजच्या टेस्ट 288,एकूण टेस्ट 472872

भंडारा – जिल्ह्यात गुरुवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.18) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 00 आहे. गुरुवारी 288 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58969 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60104 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 72 हजार 872 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60104 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
  • जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत,त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
  • सध्या सणासुदीचे दिवस आहेत आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • कोविडवर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्रीय ओबीसी महासंघ जनजागरण अभियाना अंतर्गत दिवाळी मिलन संपन्न...

Thu Nov 18 , 2021
नागपुर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ जनजागरण अभियान अंतर्गत दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या वेळी माजी आमदार सुधाकर कोहळे यांची प्रमुख उपस्थिती असून प्रमुख अतिथी गिरीश पांडव व गुणेश्वर आरीकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला. नुकत्याच झालेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात पिपळा रोड येथील मानमोडे लॉन येथे ओबीसी समाजाला जागृत करणे म्हणजेच समाजाला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com