सावनेर येथे गांजा विक्री करणाऱ्यावर सावनेर पोलीसांची धडक कारवाई

सावनेर :- दिनांक २३/०५/२०२४ रोजी पो.स्टे. सावनेर हद्दीतील माहेश्वरी लेआउट जिवतोडे हॉस्पीटल जवळ राहणारा ओम जगदीश जनरल स्टोर्स चालक चिन्नोरकर हा आपले दुकानात गांजा बाळगतो व ग्राहकांना विक्री करतो अशी विश्वसनिय माहिती सावनेर पोलीसांना मिळाली असता, सावनेर पोलीसांनी लगेच घटनेचे गांभिर्य ओळखून, माहिती वरिष्ठांना दिली असता, वरिष्ठांनी लागलीच रेड करण्याचे आदेश दिले. त्यावरुन पोलीस स्टॉफनी सदर ठिकाणी जावुन रेड केला असता, त्याचे ओम जगदीश जनरल स्टोर्स येथे लाकडी रॅकच्या खालच्या कप्प्यामध्ये एका प्लॅस्टीक चुंगळी मध्ये गुंगीकारक वनस्पती अंमली पदार्थ गांजा एकुण ०१ किलो ९२६ ग्रॅम वजन किंमती २०,०००/- रुपयाचा माल मिळुन आल्याने, सपोनि अनिल राऊत यांचे तक्रारी वरुन आरोपी नामे जगदीश लखनलालजी विन्नोरकर वय ६२ वर्ष रा. सावनेर यांचे विरुध्द पोस्टेला अपराध क्रमांक ५०६/२४ कलम २०, २२ एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीचा दिनांक २८/०५/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला असुन, पुढील सखोल तपास सपोनि मंगला मोकासे या करीत आहेत.

सदरची संपुर्ण कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोहार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, सहायक पोलीस अधीक्षक सावनेर विभाग अनिल म्हस्के यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, सहा. पोलीस निरीक्षक अनिल राउत, पोउपनि व्यंकटेश दोनोडे, अरुण राठोड, पोहवा अनुल खोडणकर, नंदकिशोर मेश्राम, अविनाश बाहेकर, संगिता कोवे, सचिन लोणारे, भावेश शेंडे, नितेश पुसाम, चापोहवा प्रितम पवार सर्व यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अवैध रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक, वाहनासह एकूण ५,५५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त

Sat May 25 , 2024
– नागपूर ग्रामीण विशेष पथकाची कारवाई नागपूर :- पोलीस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे अरोली हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, मौजा खात कडुन पांजरा मार्गे अवैधरीत्या विनापरवाना रेती (वाळू) ट्रॅक्टरमध्ये लोड करून वाहतुक करीत आहे. अशा खात्रीशीर बातमीवरून अरोली हद्दीतील मौजा खात पांजरा रोड येथे अवैध रेती संबंधाने अचानक नाकाबंदी करून एक लाल रंगाचा भुमीपुत्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com