अवघ्या ३६ तासात दरोडा टाकणारी टोळीला घरफोडी विरोधी पथक, गुन्हे शाखेंनी केला गजाआड

नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत राहणारे फिर्यादी चंद्रकांत दुरुगकर वय ३४ वर्ष त्यांचे आई सह घराचे खालच्या मजल्यावर हॉल मध्ये झोपले असतांना घरातील रात्री अचानक इलेक्ट्रीक लाईट बंद झाल्याने व फिर्यादीचे आईला घराचे जिन्यावर काही तरी आवाज आल्याने फिर्यादीचे आईने फिर्यादीचा मोठा भाऊ स्वप्नील याला फोन केला व नंतर फिर्यादीला देखील आवाज दिला तेव्हा फिर्यादीने मुख्य दार उघडले असता मुख्य दाराच्या बाहेर ५ ते ६ अनोळखी इसम हातात तलवार व धारदार शस्त्र घेवून खाली बसलेले होते फिर्यादीने दार उघडताच त्या इसमांनी फिर्यादीने उघडलेल्या दाराला धक्का देवून फिर्यादीला घराचे आत लोटून ते घरात घुसले त्यापैकी एका अनोळखी इसमाने हातात चाकु सारखे धारदार शस्त्राने फिर्यादीवर हल्ला केला. तेव्हा फिर्यादी स्वतःचा बचाव करीत असतांना उजव्या हाताने फिर्यादीने शस्त्र पकडले असता सर्व आरोपीतांनी मिळून फिर्यादीला खाली पाडुन त्यातील एका आरोपीने त्याचे जवळील तलवारीने फिर्यादीचे डावे हाताचे मनगटावर वार करून जखमी केले व फिर्यादीचे आईला पकडून ठेवले. आरोपीतांनी म्हटले की, तुला आणि तुझ्या आईला मारून टाकील चुपचाप पडुन रहा. असे धमकावुन फिर्यादीला बेडरूम मध्ये घेवून जाऊन बेडरूम मधील लाकडी कपाटातील कापडी प्लॉस्टीक बास्केट चे मागे प्लॉस्टीकच्या पिशवी मध्ये ठेवले असलेले नगदी आठ लाख रूपये बळजबरीने काढून घेवून पळून गेले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचे समांतर तपास करीत असतांना सपोनि, मयुर चौरसिया यांनी नागपूर शहरात लागलेले सि. सी टी वी कॅमरे तसेच खाजगी कॅमरे असे अंदाजन १५० ते २०० कॅम-याची तपासणी तसेच अत्याधुनिक तांत्रिक पद्धतीचा वापर करून व गुन्हे शाखेचे सायबर सेल ची विशेष मदत घेवून कट रचणारे मुख्य आरोपी नामे जयंत सतिश कांबळे याचा अतिशिताफीतीने शोध घेवून ताब्यात घेतले. त्यास गुन्हयाबाबत बारकाईने व सखोल विचारपुस केले त्यावर त्याने सांगीतले की, फिर्यादी याचे घरी मोठ्या प्रमाणात रूपये व सोन्याचे दागिणे आहे. अशी टिप मंगेश झल्के, सुमित घोडे यांचे कडुन प्राप्त करून डकैती साठी गुड उपल्बध करून देणारा शेख अमीन उर्फ अस्लम याचे सोबत संपर्क करून पाहिजे आरोपी इमरान खान, दानिश, फहीम चुहा व ईतर सोबत कट रचुन फिर्यादीचे घरी मध्यरात्री प्रवेश करून त्यांना शस्त्राचे धाक दाखवुन किंवा त्यांचे वर हमला करून दरोडा टाकलेला आहे. व तेथुन प्राप्त दरोडयाची रकम आपसात वाटुन घेतलेली आहे.

सदर घटनेला अंजाम देण्याकरिता १ महिन्यापुर्वी पासुन रेकी व योजना सुरू असल्याचे आरोपी कडुन माहिती प्राप्त झाली आहे.

अप.क व कलम ९२/२०२४ कलम ३९७, ४५९, ५०६ (ब) भादवी. सहकलम ४, २५ भा.ह.का. सहकलम १३५ महा. पो. कायदा अन्वये गुन्हा नोंद करून आरोपींना अटक करण्यात आली.

आरोपीच्या ताब्यातुन १) नगदी ५, १०, ०००/- रू रोक रकम

२) एकुण ६ मोबाईल एकुण

३) हिरो माईस्ट्रो वाहन क्र एमएच ४० बीएम ९२४६ कि ३५,०००/-रू

असा एकुण ५, ९५, ०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरने,अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, पोलीस उप आयुक्त अर्चित चांडक, (डिटेक्शन), सहायक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील, गुन्हे शाखा, नागपुर शहर यांचे मार्गदर्शनात सदरची कार्यवाही सहायक पोलीस निरीक्षक मयुर चौरसिया, पो.हवा राजेश देशमुख, पो. हवा सुनिल ठवकर, रवि अहीर, प्रशांत गभणे, श्रीकांत उईके, नापोअ प्रविण रोडे, चेतन पाटील, पो.अ आशिष वानखडे, पो.अं निलेश श्रीपात्रे, चालक सुधिर पवार, विशेष सहकार्य सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक विवेक झिंगरे, शेखर राघोते, अनंता क्षीरसागर, पराग ढोक, यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जर्मनी के न्यूरेमबर्ग अंतर्राष्ट्रीय खिलौना मेले में भारतीय खिलौना विनिर्माताओं को बड़ी संख्या में ऑर्डर प्राप्त हुए

Tue Feb 6 , 2024
– सरकार की अनिवार्य गुणवत्ता मानदंडों, सीमा शुल्क में वृद्धि और खिलौनों पर राष्ट्रीय कार्य योजना ( एनएपीटी ) जैसी पहलों ने वैश्विक ध्यान आकर्षित करते हुए उच्च गुणवत्ता वाले खिलौनों के विनिर्माण को प्रोत्साहित किया नई दिल्ली :-निर्यातकों का कहना है कि 30 जनवरी 2024 से 3 फरवरी, 2024 तक चलने वाले जर्मनी के न्यूरेमबर्ग अंतर्राष्ट्रीय खिलौना मेले में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com