संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 26 :- कामठी, तालुक्यातील खैरी ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक विहिरीत सहा फुट विषारी साप असल्याची माहिती सरपंच मोरेश्वर कापसे यांना मिळताच त्यांनी सार्वजनिक विहिरीवर सर्प मित्राला बोलवून सहा फूट विषारी सापाला बाहेर काढून जीवनदान दिल्याची घटना आज रविवारला सकाळी दहा वाजता सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार खैरी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीत सकाळी काही नागरिकांना विषारी साप असल्याचे दिसून आले त्यांनी सापा संदर्भात सरपंच कापसे यांना माहिती दिली त्यांनी सार्वजनिक विहिरीवर जाऊन गावातील सर्पमित्र अमोल पिंपळखेडे यांना बोलावून पाहणी केली व विहिरीत सर्पमित्र अमोल पिपळखेडे उतरून सहा फूट विषारी सापाला पकडून विहरी बाहेर काढून जीवनदान दिले.व विषारी सापाला जंगलात सोडले गावातील सर्पमित्र अमोल पिंपरखेडे अनेक वर्षापासून सापांना वाचविण्याचे महान कार्य करीत आहे त्याबद्दल खैरी ग्रामपंचायतचे सरपंच मोरेश्वर कापसे यांनी त्यांचे अभिनंदन केले.