अवैध रेती चोरी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल 

– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई

भिवापूर :- अंतर्गत २० कि.मी. अंतरावरील मौजा मालेवाडा फाटा येथे दिनांक २४/०९/२०२३ मे १४.३० या दरम्यान पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ यांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे भिवापूर हद्दीतील मौजा मालेवाडा फाटा येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून मौजा मालेवाडा फाटा येथे पोलीस स्टेशन भिवापूर येथील पोलिस स्टाफ यांनी नमुद घटनास्थळी जावून चेक केले असता टिप्पर क्र. एम. एच. ४० वी एल ४७१८ या चालक आरोपी चालक राहुल रमेश खेरवार, वय २६ वर्षे, रा. सेनापती नगर दिघोरी नागपुर हा भिस्सी कडुन टिप्पर मध्ये विनापरवाना रेती भरून भिवापुर मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ ई रोडने नागपूरकडे जात असता त्यास परवाना विचारले असता त्याने परवाना सादर केला नाही. त्यावर सदर आरोपी हा त्याचे ताब्यातील स्वतः चे वाहनात शासनाचे ताब्यातील अंदाजे ०६ ब्रास रेती किंमती ३००००/- रूपयाचा मुद्देमाल एक पांढर्या निळया रंगाचे १० चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४० बी एल – ४७१८ किंमती २०,००,०००/- रू. टिप्पर मध्ये भरून असलेले ०६ ब्रास रेती प्रत्येकी ५,०००/- रु बास प्रमाणे एकुण किंमती ३०,००० /- रु. असा एकूण २०,३०,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीविरुध्द कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सर्फो / १२७० अशोकसिंग ठाकुर वय ५१ वर्षे पोस्टे भिवापुर हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट महावितरणकडून चार महिने आधीच पूर्ण

Tue Sep 26 , 2023
नागपूर :- राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले 100 मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले असून या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांचे आणि महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. उद्दीष्ट पूर्ण झाले असले तरीही महावितरण ही मोहीम यापुढेही चालू ठेवणार असून अधिक जोमाने काम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com