संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा टेनिस (पुरुष) संघ घोषित

खामगाव येथे खेळाडूंचे 13 नोव्हेंबरपासून प्रशिक्षण शिबिर

अमरावती :-  मुंबई विद्यापीठाच्या बी.के.बिर्ला कॉलेज, कल्याण जि.ठाणे येथे दिनांक 26 ते 30 नोव्हेंबर दरम्यान होणा-या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ टेनिस (पुरुष) स्पर्धेसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित झाला आहे. या खेळाडूंचे प्रशिक्षण शिबिर दिनांक 13 ते 22 नोव्हेंबर 2022 दरम्यान खामगाव येथील जी.एस.सायन्स कॉलेज येथे होणार आहे.

खेळाडूंमध्ये खामगाव येथील जी.एस.सायन्स कॉलेजचा शिमोन शास्त्री, मोहंमद मुस्तफा काझीम, हितेश दासमलानी व धर्निधर मिश्रा, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा शाहीर फरहाज, तर राखीवमध्ये विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा अनुज शिंगरोळ, श्री शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, अकोलाचा पवन बिडकर यांचा समावेश आहे.

सर्व खेळाडूंनी खामगाव येथील जी.एस.सायन्स कॉलेज येथे होणा-या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित रहावे, असे आवाहन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे यांनी विद्यापीठाच्या वतीने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत आघाडी होणार की नाही? अजित पवारांचं कार्यकर्त्यांना उद्देशून मोठं विधान 

Fri Nov 4 , 2022
अहमदनगर :- राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आजपासून शिर्डीत चिंतन शिबीराचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोलाच्या सूचना दिल्या. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागा, अशा सूचना अजित पवारांनी दिल्या. विशेष म्हणजे अजित पवारांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com