– महोत्सवाच्या कार्यालयात प्रवेशिका उपलब्ध
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप सुप्रसिद्ध सनम बँडच्या सादरीकरणाने होणार आहे. समारंभाकरिता कार्यक्रमासाठी प्रवेशिका आवश्यक असून नागरिकांनी १ फेब्रुवारीपर्यंत खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयांमध्ये भेट देउन आपल्या प्रवेशिका प्राप्त करुन घ्याव्यात, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
रविवारी २ फेब्रुवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे सायंकाळी ५.३० वाजता खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप कार्यक्रम होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सवाचा समारोप थाटात व्हावा याकरिता तरुणाईची पसंती असलेल्या ‘सनम बँड‘चे सादरीकरण समारोपीय कार्यक्रमात होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका खासदार क्रीडा महोत्सवाचे सीताबर्डी येथील ग्लोकल मॉल मधील मुख्य कार्यालय, यशवंत स्टेडियम, नक्षत्र सभागृह प्रतापनगर, यश कॉम्प्लेक्स भरत नगर चौक, चिटणीस पार्क महाल, माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान रेशीमबाग चौक, गिरनार क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँक लि. सुनील हॉटेल जवळ आणि जिंजर मॉल जरीपटका या ठिकाणी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या कार्यालयांमध्ये भेट देउन आपल्या प्रवेशिका प्राप्त करुन घ्याव्यात, असेही आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.