संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला आपल्या तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम छत्रपती संभाजी महाराजानी केला होता.छत्रपती शिवाजी महाराजा बरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबविल्या. त्यांना कधीही अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल असा योद्धा तत्कालीन हिंदुस्तानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते असे मौलीक प्रतिपादन माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी छत्रपती नगर येथे आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल 14 मे ला छत्रपती नगर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रतीक पडोळे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या तैल्यचित्र प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.याप्रसंगी अनिल गंडाईत,नवीन कोडापे,राजा उईके,क्रिश सातपुते,दिनेश देवांगण,पंकज कुरील,कुणाल रंधई, बंटी पिल्ले आदी उपस्थित होते.