माहिती संचालक गणेश रामदासी सेवानिवृत्त ; संचालक कार्यालयातर्फे निरोप

नागपूर दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभागाचे संचालक गणेश रामदासी हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला.

माहिती संचालक कार्यालयात आयोजित निरोपसमारंभास माध्यम समन्वय अधिकारी अनिल गडेकर, सहायक संचालक पल्लवी धारव, विभागीय माहिती केंद्राचे प्र.जिल्हा माहिती अधिकारी रितेश भुयार यांच्यासह संचालक कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

माहिती संचालक गणेश रामदासी हे वर्ष २००२ मध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या दिल्ली स्थित महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक म्हणून रूजू झाले होते. यानंतर त्यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारीक अन्वर, केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांचे अतिरीक्त स्वीय सहायक म्हणून जबाबदारी सांभाळली. मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून वर्ष २०१८ मध्ये त्यांची पदोन्नती झाली. यानंतर मुंबई येथे संचालक प्रशासन, संचालक वृत्त व जनसंपर्क पदाचा कार्यभार सांभाळला. गणेश रामदासी यांची नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. नियत वयोमानानुसार ते आज सेवानिवृत्त झाले आहेत.

गणेश रामदासी आणि त्यांच्या पत्नी गायत्री रामदासी यांचे स्वागत करून भेट वस्तू देत निरोप देण्यात आला. माहिती व जनसंपर्क विभागात विविध पदांवर काम करीत असतांना आलेले अनुभव तसेच प्रसिद्धी विषयक कामाचा अनुभव गणेश रामदासी यांनी यावेळी कथन केला व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मकदृष्टीकोण बाळगावा असेही त्यांनी सांगितले. गणेश रामदासी यांच्या दिल्लीतील वैविद्यपूर्ण कारकिर्दीवर रितेश भुयार यांनी प्रकाश टाकला,  गडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. पल्लवी धारव यांनी सूत्रसंचालन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भर उन्हाळ्यात मुस्लिम समाज धरताहेत रमजानचे उपवास

Mon Apr 1 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – शांतीचा संदेश देणारा रमजान पर्व – मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये उत्साह कामठी :- मुस्लिम समुदायाच्या पवित्र रमजान महिन्याला 12 मार्च पासून सुरुवात झाली आहे.’रमजान ‘च्या.या महिन्यात आपल्या अनुयायांवर अल्लाहची खूप मोठी कृपादृष्टी असते..या रमजान महिन्याला ‘बरकती’चा महिना असा सुद्धा संबोधील्या जाते.मनामनातिल दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव , सदभाव वाढवित संयम, त्याग, शांती, सहिष्णुता,चांगुलपणा , प्रामाणिकपणा अशा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com