नागपूर :- समता सैनिक दल व फुले आंबेडकरी राष्ट्रीय विद्यार्थी- पालक संघटना च्या वतीने 15 व 16 एप्रिल ला राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या विषयावर कामठी रोड वरील नागलोक येथे दोन दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
2014-15 साली RSS प्रणित भाजप सरकार सत्तेवर आल्यावर शिक्षणाच्या ब्राह्मणी करणची योजना आखून 2020 ला ब्राम्हणी विचारांचे राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर केले. 2023 या वर्षीपासून त्याला अमलात आणले. त्या ब्राम्हणी शिक्षण धोरणाचा भंडाफोड करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
दुसऱ्या दिवशीच्या चर्चासत्रात ब्राह्मणी शिक्षण व्यवस्थेची मूलतत्त्व या विषयावर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय समन्वयक प्रदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र झाले. या विषयावर महाराष्ट्र राज्याचे निवृत्त माहिती संचालक भिक्खु महेंद्र कौसल, बसपाचे मिडिया प्रभारी उत्तम शेवडे, सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकरी अभ्यासक प्रदीप मुन यांनी प्रमुख वक्ते म्हणून आपली भूमिका मांडली.