दीक्षाभूमीत ’महामानवा’ला अभिवादन

– भदन्त ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना

नागपूर :- जगाला शांती, करूणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनानिमित्त महात्मा बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, अखिल भारतीय धम्मसेना आणि भिक्खु महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे आयोजित कार्यक्रमात स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. स्तुपाच्या आत तथागत बुद्ध यांच्या प्रतिमेला नतमस्तक होत अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेतल्यानंतर जयघोष करण्यात आला.

याप्रसंगी स्मारक समितीचे डॉ. सुधीर फुलझेले, आनंद फुलझेले, प्राचार्या डॉ. मेहरे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, भंते नागसेन, भिमाबोधी, अश्वजित, नागवंश, भिक्खुनी संघप्रिया, विशाखा, धम्मशीला, रवी मेंढे, शैलेश सवईथुल, अशोक गोवर्धन, आशिष शेंडे, मिताश सवाईथुल, अर्णव सवाईथुल, रंजना मेश्राम, सुजाता अंबादे यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विविध दैनिक वृत्तपत्रात नागपूर महानगरपालिकेवर जलसंपदा विभागाची रू. 1600 कोटीची थकबाकी बाबत प्रकाशीत वृत्ताबाबत खुलासा

Fri May 24 , 2024
नागपूर :-विविध दैनिक वृत्तपत्रात नागपूर महानगरपालिकेवर जलसंपदा विभागाची रू. 1600.00 कोटीची थकबाकी बाबत जे वृत्त प्रकाशीत झाले त्याबाबत कळविण्यात येते कि सदर थकबाकी रू. 16.10 कोटी इतकी आहे. उपरोक्त थकबाकी जलसंपदा विभागाने कन्हान नदीवरून उचल केलेल्या पाण्यावर आकारण्यात येत असलेल्या पाणीपट्टी मध्ये मनपाच्या औद्योगीक वापरांवर 3% ने बिलींग करण्याऐवजी डिसेंबर, 2017 ते जानेवारी, 2019 या कालावधीत 8.65% ने बिलींग करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com