नागपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. उपायुक्त आशा पठाण, चंद्रभान पराते, रमेश आडे, संघमित्रा ढोके, सहायक आयुक्त हरिष भामरे, मनोहर पोटे, तहसीलदार डॉ. हंसा मोहने यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नायब तहसीलदार आर. के. दिघोळे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उपजिल्हाधिकारी पीयूष चिवंडे, तहसीलदार श्रीराम मुंदडा यांच्यासह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.