घरफोडीचा गुन्हा उघडकीस एका आरोपीस अटक, ७९,६५,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त.

नागपूर :-दिनांक १४.०५.२०२३ चे २२.०० वा ते दि. १७.०५.२०२३ चे ००.४५ वा चे दरम्यान फिर्यादी मनिषा विजय कपाई वय ५२ वर्ष रा. वैष्णवी कुटी, प्लॉट न. ७. साईबाबा कॉलोनी, कोराडी रोड, मानकापूर यांच्या आईचा मृत्यू झाल्याने त्या परीवारासह अमृतसर येथे गेल्या होत्या परत आल्या असता अज्ञात आरोपीने त्यांचे घराचे वालकप्राउड चे लोखंडी गेटचे तसेच मुख्य दाराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला व घराच्या वरचे माळयावरील रूम मधील आलमारीचे लॉकर तोडुन त्यातील सोन्याचे दागिने व रोख ७०,००,०००/- रू तसेच जुनी वापरती मारोती दोन क्र. एम.एच. ३१ सि.पी. २२७२ असा एकूण किमती ७०,५३,०००/- रु मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे मानकापूर येथे अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा नोंद होता. फिर्यादी यांनी दिलेल्या पुरवणी बयानानुसार नमुद गुन्हयामध्ये चोरीस गेलेली मालमता एकुण ०१ कोटी २० लाख रूपये असल्याचे सांगीतले आहे.

गुन्हयाचे तपासात मानकापुर पोलीसांनी तांत्रीक दृष्टीने तसेच मिळवलेल्या खात्रीशीर माहीतीवरून छत्तीसगड येथे जावून शोध घेवून नमुद गुन्हा हा आरोपी नरेशकुमार अंकालु महीलागे, वय २४ वर्षे, रा. उदयपुर, तह.जि. खयगड (छत्तीसगढ) याने केल्याचे निष्पण केले. तसेच नमुद गुन्हयात आरोपीची महीला साथीदार आरोपी नामे गायत्री उर्फ पिंकी अमोल गजभिये, वय ३० वर्षे, रा. प्लॉट नं. १५९० मिनीमाता नगर, कळमना, नागपुर हीने व आरोपीचे वडील अंकालु दुराम महीलागे, वय ५५ वर्षे, रा. वार्ड नं. ०९, उदयपुर, खयगड (छत्तीसगड) यांनी संगनमत करून त्यांना नमुद गुन्हयातील मालमत्ता ही चोरीची असल्याचे माहीती असताना ती मालमता लपवुन ठेवण्याकरीता व विल्हेवाट लावण्याकरीता मुख्य आरोपीस सहाय्य केल्याचे निष्पण्ण झाल्याने गुन्हयात कलम ४१४, ३४ भादवि. अन्वये वाढ करण्यात आली आहे. मानकापुर पोलीसांचे पथकाने आरोपीचे वडील अंकालु महीलागे यांना दि. २४.०५,२०२३ रोजी अटक करून त्यांचे ताब्यातून गुन्हयातील चोरीस गेलेले पैकी नगदी ७७,५०,०००/- रु. तसेच, मारूती झेन क एम.एच. ३१/ सि.पी. २२७२ व रोख ०२ लाख रूपये असा एकूण ७९,६५,०००/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाहीला आरोपी व त्याची साधीदार महीला आरोपी यांचा शोध सुरू आहे.

अटक आरोपी यांस मा. न्यायालय समक्ष हजर करून त्याची दि. २६.०५.२०२३ रोजी पावेतो पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.  अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रादेशिक विभाग) संजय पाटील, पोलीस उप आयुक्त (परी ०२) राहुल मदने, सहा. पोलीस आयुक्त हिरेमठ (सदर विभाग), यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि शुभांगी वानखेडे, पोउपनि अंकीत अपवार, सफी, सुनिल इंगवल, नापोअ. राहुल गवई, पोअ, अनुप यादव, योगेश महल्ले, प्रविण भोयर यांनी केली.

NewsToday24x7

Next Post

वाहनचोरीचा गुन्हा उघडकीस ४,००,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त

Thu May 25 , 2023
नागपूर :- फिर्यादी मोनीका रंजीत राठोड वय ३९ वर्षे, रा. पापुलर हाऊसिंग सोसायटी, मनीष नगर, नागपुर या नागपुर प्रादेशिक कार्यालय येथे वायुवेग वाहन पथक मध्ये कार्यरत असुन त्यांनी पिवळ्या रंगाची टाटा कंपनीची स्कुलबस क. एम.एच.४९/जे. ०७५६ किंमती अंदाजे ४,००,०००/-रू ही कार्यवाही दरम्यान जप्त करून ती प्रादेशिक परीवहन कार्यालय, नागपुर शहर कार्यालयाचे परीसरात ठेवली असता, दिनांक ०८.०९.२०२२ चे १४. १४ वा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com