मोटर सायकल चोरी करणारा गुन्हेगार गजाआड

– स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामिणची कारवाई 

नागपूर :-फिर्यादी देविदास नामदेव मेंढे, वय ४० वर्ष रा. उदापुर ता. रामटेक हे दि. ०८/०७/२०२३ रोजी सायंकाळी ०६/३० वा. दरम्यान नगरधन येथील पाणठेल्यावर खर्रा आणण्यासाठी गेले असता फिर्यादीने आपली मोटर सायकल पाणठेल्याजवळ ठेवली होती. फिर्यादी यांची हिरो होन्डा सिडी डिलक्स काळया रंगाची लाल पट्टे असलेली जिचा क्रमांक MH-40-H-6309 असा असुन जिचा चेवीस क्रमांक 07223F26058 व इंजिन क्रमांक 072216124 असा कोणीतरी अज्ञात चोराने नगरधन येथून चोरून नेली आहे. अशा फिर्यादीच्या रिपोर्ट वरून पोस्टे रामटेक येथे अप क्र. ४५९/२३ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद झाला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असतांना दिनांक ११/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामटेक उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय खबरी मार्फत मिळालेल्या माहितीनुसार आकाश पुरी नावाच्या इसमाकडे चोरीची मोटर सायकल असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार सदर पथकाने गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस ठाणे रामटेक परिसरातुन पथकाने सापळा रचून संशयीत इसम आकाश निरंजन पुरी, वय २१ वर्ष, रा. वार्ड नं. १, नगरधन, ता. रामटेक, जि. नागपूर याला ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातून चोरी केलेली एक मोटर सायकल क्र. हिरो होंडा CD डिलेक्स मो. सा. क्र. MH-४० १३०९ किंमती अंदाजे २५,०००/-रुपये २) नगदी ५०००/- रुपये जप्त करून त्याच्याकडून पो.स्टे. रामटेक येथील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. पोलीस ठाणे रामटेक, नागपूर ग्रामीण १) अप.क्र. ४५९/२३ कलम ३७९ भा.द.वि. २) अप.क्र. ४५८/२३ कलम ३७९ भादवि. हा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमूद आरोपीची वैद्यकिय तपासणी करून जप्त मुद्देमाल व कागदपत्रांसह पोलीस ठाणे रामटेक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरिक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे, पोलीस नायक विपीन गायधने, प्रमोद भोयर, निवेश पीपरोदे, चालक पोलीस हवालदार अमोल कुठे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विनयभंग करणाऱ्या आरोपीला कोर्टातून शिक्षा

Thu Jul 13 , 2023
देवलापार :- येथील फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. देवलापार येथे अप. क्र. १४४/२१ कलम ३५४(अ) भादवि सहकलम ८, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादी व आरोपी पुरूषोत्तम बाबुलाल कोकोडे, वय ३५ वर्ष, रा. जुनेवाडी देवलापार हे एकाच गावात आजुबाजुला राहत होते. यातील आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन पिडीत मुलीला आधारकार्ड काढण्याकरीता घेवुन गेला व परत येताना आरोपीने स्वतःच्या शेतात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com