सुपारे नगरातून वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून तीन अज्ञात आरोपी पसार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मागील काही दिवसात जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत दोन वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढण्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच काल सायंकाळीं 7 वाजे दरम्यान स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कामठी -कळमना मार्गावरील सोनू बार मागील सुपारे नगर न्यूयेरखेडा येथे गुरुवारला सायंकाळी साडेसात वाजता सुमारास 80 वयाचे वृद्ध घरात बसून टीव्ही पाहत असताना अज्ञात तीन आरोपी घरात येऊन गळ्यातील चार तोळे सात ग्राम सोन्याची चैन घेऊन कळमना कळवण्याच्या दिशेने पसार झाले . नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिकारी कारोजी शेंडे वय 80 वर्ष राहणार सोनू बार च्या मागे सुपारे नगर न्यू येरखेडा हे आपल्या घरात गुरुवारला सायंकाळी साडेसात सात वाजता सुमारास टीव्ही पाहत असताना अज्ञात तीन आरोपी मोटरसायकलवर येऊन डोअर बेल वाजवली भिकारी कारोजी शेंडे यांनी दार उघडताच तीनही आरोपी घरात आले व भिकारी यांच्या गळ्यातील चार तोडे सात ग्राम वजनाची सोन्याची चैन तोडून मोटार सायकलने कळमण्याच्या दिशेने पसार झाले भिकारी कारोजी शेंडे लगेच घराबाहेर येऊन आरडाओरड करू लागले त्यामुळे शेजारी नागरिक धावून आले तोपर्यंत आरोपी कळमण्याच्या दिशेने पसार झाले होते भिकारी कारोजी शेंडे यांच्या घरी काम करणारी महिला अर्चना रतीराम गजभिये वय 40 वर्ष राहणार जय भीम चौक कामठी यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला जाऊन 4 तोळे 7 ग्राम सोनसाखळी चैन किंमत 2लाख 50 हजार 838 रुपये गेल्या ची तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी कलम 392, 34 भादविनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बोधिमग्गो येथे बुद्ध जयंती - वेसाक उत्सव प्रारंभ

Fri May 24 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  नागपुर :- बोधिमग्गो महाविहार (भदन्त बोधिवविनीत महाथेरो स्मृति परिसर), इसासनी-भीमनगर, हिंगना रोड, नागपूर येथे गुरुवार, दिनांक 23 मे 2024 ला “बुद्ध जयंती – वैशाख पौर्णिमा” पवित्र दिनी उपोसथ, धम्मदेसना तसेच अनेक प्रकार च्या स्पर्धा, धम्म रैली, संघदान, भोजनदान कार्यक्रमाला शुरूवात झालेली आहे. कार्यक्रमा चे उद्घाटन प्रसंगी पुज्य भदन्त नागदिपंकर महाथेरो, डाॅ. भदंत सीलवंस महास्थविर, भदंत महानाम, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com