नाल्यांच्या पुलांवर लागणार सुरक्षा जाळी 

– प्रत्येक झोनमधील महत्वाच्या ठिकाणी उपाययोजना

नागपूर :- नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या पूलांवर लोखंडी जाळी लावण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आलेला आहे. पुलावरून कुणीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना म्हणून दहाही झोनअंतर्गत नाल्यांच्या पूलांवर दोन्ही बाजूला ही जाळी लावण्यात येणार आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील दहाही झोनमधून नाल्यांवरील ५८ ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. या पूलांवर जाळी लावण्याचे काम सुरू करण्यात येत आहे.

पूलांवरून मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. या समस्येवर उपाययोजना म्हणून मनपाद्वारे दहाही झोनमधील नाल्यांच्या ५८ पुलांवर दोन्ही बाजूला मजबूत लोखंडी कठडे आणि त्यावर जाळी लावण्यात येत आहे.

लक्ष्मीनगर झोनअंतर्गत खामला चौक सहकार नगर घाट यासह एकूण ५ ठिकाणी सुरक्षा जाळी लावली जाणार आहे. याशिवाय धरमपेठ झोनमधील अंबाझरी ओव्हर फ्लो, यशवंत स्टेडियम नाग नदी, भोले पेट्रोल पम्प जवळील नाला यासह एकूण ११ ठिकाणी, हनुमान नगर झोनमधील मानेवाडा घाट बेसा रोड यासह एकूण ५ ठिकाणी, धंतोली झोनमधील नरेंद्र नगर चौक, सरदार पटेल चौक घाट रोड यासह एकूण ७ ठिकाणी, नेहरू नगर झोनमधील जगनाडे चौक नाला यासह एकूण ४ ठिकाणी, गांधीबाग झोनमधील गंगाबाई घाट पुलासह एकूण ५ ठिकाणी, सतरंजीपुरा झोनमधील शांतीनगर नाला जैन मंदिर जवळ यासह एकूण ५ ठिकाणी, लकडगंज झोनमधील कृषी विद्यापीठासह एकूण ५ ठिकाणी, आशीनगर झोनमधील अशोक चौक नाला यासह ६ ठिकाणी आणि मंगळवारी झोनमधील पोलिस तलाव चौक यासह ५ ठिकाणी सुरक्षा जाळी लावण्यात येणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दीक्षाभूमीत ’महामानवा’ला अभिवादन

Fri May 24 , 2024
– भदन्त ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना नागपूर :- जगाला शांती, करूणा आणि मैत्रीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती दिनानिमित्त महात्मा बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहे आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी, अखिल भारतीय धम्मसेना आणि भिक्खु महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी येथे आयोजित कार्यक्रमात स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com