संत गाडगेबाबा यांची दशसुत्र फलक मंत्रालया च्या ग्राउंड फ्लोअरवर त्वरित लावण्याची मागणी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

संतगाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती व्दारे जिल्हाधिकारी मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना निवेदन. 

कन्हान : – आघाडी सरकारने मंत्रालयाच्या ग्राउंड फ्लोअर वर संत गाडगे बाबा यांचे दशसुत्र कार्यक्रमा सहित लावलेले चित्र शिंदे-फडणविस सरकारने हट विल्याने राज्यातील संत गाडगेबाबाचे सर्व विचार प्रेमी यांच्या भावना दुखाविल्याने पुर्वरत त्वरित लावण्यात यावे. अशी मागणी संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती महाराष्ट्र च्या पदाधिका-यानी  जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन केली आहे.

राज्यात तीन वर्षां पुर्वी असलेल्या आघाडी सरकारने मंत्रालयाच्या ग्राउंड फ्लोअर वर संत गाडगे बाबा यांचे दशसुत्र कार्यक्रमा सहित लावलेले चित्र शिंदे-फडणविस सरकारने हटविल्याने राज्यातील संत गाडगेबाबाचे सर्व विचार प्रेमीयांच्या भावना दुखावि ल्याने नागरिकां मध्ये सरकार विरुद्ध तीव्र रोष निर्माण झाल्याने संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती महाराष्ट्रच्या पदाधिका-यानी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन त्वरित संत गाडगे बाबा यांची दशसुत्र फलक मंत्रालयाच्या ग्राउंड फ्लोअ र वर लावण्याची मागणी केली आहे. अन्यथा राज्या तील संपुर्ण गाडगेबाबा विचार प्रेमी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करतील अशा ईशारा देण्यात आला आहे.याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष अनिल शिंदे, सचिव सचिन शाहाकार, जिल्हाध्यक्ष डोमा क्षिरसागर, सचिव विनोद गवळी, युवा जिल्हाध्यक्ष पंकज नांदुरकर, हनुमंतजी क्षिरसागर, अभिजित आंबुलकर, नंदकिशोर केकतपुरे , धीरज ढवळे, दशरथजी घोंगळे, मंगेशजी घोंगळे, अमित क्षिरसागर, साहिल भोयर, चरणजी क्षिरसागर, एकनाथजी उमक, अमोल उमक सह संत गाडगे बाबा विचार प्रेमी प्रामुख्याने उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com