मनपाद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि स्वच्छतेचे धडे

– महिला समानता दिवसानिमित्त जनजागृती

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षा आणि स्वच्छतेचे धडे देण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनामध्ये सोमवारी (ता.२६) महिला समानता दिवसाच्या अनुषंगाने नागपूर शहरातील माउंट कार्मेल गर्ल्स स्कूल, नवचैतन्य स्कूल, लाल बहादुर शास्त्री स्कूल, वंदे मातरम् स्कूल, धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, ताजबाग उर्दू हायस्कूल, संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’बाबत अवगत करण्यात आले. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्याच्या हेतूने सरकारने पोक्सो कायदा तयार केलेला आहे. या कायद्यांतर्गत बालकांना सुरक्षित स्पर्श अर्थात ‘गुड टच’ आणि ज्या स्पर्शामुळे असुरक्षितता वाटते असा स्पर्श अर्थात ‘बॅड टच’ बाबत माहिती देण्यात आली. कुणाकडूनही असुरक्षित स्पर्श (बॅड टच) झाल्यास त्याविरोधात आवाज उचलणे आणि आवश्यकतेनुसार सुरक्षेचे उपाय कसे अवलंबायचे, याबाबत देखील विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली. आपल्या घरातून निघणारा सर्व प्रकारचा कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा कसा वर्गिकृत करायचा, तो कोणत्या रंगाच्या कचरापेटीत टाकायचा, त्यामुळे काय फायदा होणार यासंपूर्ण बाबींबाबत मुलांना सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. कचरा कुठेही न फेकता तो कचरा गाडीतच देण्यात यावा, याबाबत देखील मुलांना जागरूक करण्यात आले.

कार्यक्रमात मनपाच्या आयईसी चमूच्या स्वयंसेवकांद्वारे विद्यार्थ्यांना जागरुक करणारे प्रात्यक्षिक सादर केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नझूल जमिनीबाबत आज व उद्या शिबिराचे आयोजन

Tue Aug 27 , 2024
यवतमाळ :- नागपूर व अमरावती विभागातील लिलावाद्वारे वा अन्य प्रकारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या नझूल जमीनीचे शर्थभंग नियमानुकूल करून नुतनीकरण करणे तसेच नझूल जमीनी बी मधून सत्ताप्रकार ए फ्री होल्ड भोगवटदार वर्ग एक करणेबाबत उपविभागीय कार्यालय, यवतमाळ येथे दि.27 व दि.28 ऑगस्ट रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा संबंधितांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूर व अमरावती विभागातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com