कोरोमंडल एक्स्प्रेस अपघातातील मृतांची संख्या 300 वर, 900 प्रवासी जखमी; मदतकार्य अजूनही सुरूच

बालासोर :- ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन ट्रेनचा विचित्र अपघात झाला आहे. बहनागा स्टेशनजवळ हावडा एक्सप्रेस, कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली. या अपघातात 288 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. कोरोमंडल पश्चिम एक्सप्रेसही पश्चिम बंगालमध्ये कोलकाताच्या हावडा स्टेशन आणि तामिळनाडूच्या चेन्नई दरम्यान धावते. या अपघातानंतर एक दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

कोरोमंडल एक्सप्रेस शालीमार रेल्वे स्टेशनपासून चेन्नई सेंट्रल पर्यंत जाते. ही ट्रेन 1959 किलोमीटरचं अंतर 25 तासात कव्हर करते. शुक्रवारी कोरोमंडल ट्रेन शालीमार स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 2 पासून 10 मिनिटे उशिराने म्हणजे दुपारी 3.30 वाजता निघाली होती. त्यानंतर काही मिनिटातच ट्रेनने टाईम कव्हर केला. त्यानंतर 253 किमी लांब बाहानगा बाजार रेल्वे स्थानका जवळ अपघात झाला.

सर्व काही अस्तव्यस्थ

या अपघातानंतर सर्व काही अस्तव्यस्त झालं आहे. रेल्वेच्या डब्यातील परिस्थिती पाहून तर काळीज हेलावून जातं. रेल्वेच्या डब्ब्यात खाण्याचे पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, कपडे, चप्पल, बूट आमि एमर्जन्सी अलार्म सर्व काही अस्तव्यस्त पडलेलं आहे. या रेल्वेत अजूनही लोक अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, रेल्वे कर्मचारी, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

 

NewsToday24x7

Next Post

मी वादळाची लेक!; पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी केले अभिवादन

Sat Jun 3 , 2023
बीड :- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही वेळा आधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन आहे. यावर पंकजा मुंडे बोलल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचं वादळी जीवन राहिलं आहे. मी वादळाची लेक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी काही वेळाआधी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं. सध्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com