बुट्टीबोरी :- सोनेगाव बोरी शिवारातील शेतकरी नामे शैलेश गोविंदराव खापने व विनोद महादेव निमकर दोन्ही रा. सोनेगाव बोरी यांनी आपले शेतात लागवड करून मशीनने काढून ठेवलेला चना, तुर व गहू असा एकूण १,४२,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेले यातील दोन्ही फिर्यादी यांनी पो.स्टे. बुट्टीबोरी येथे येवून तोंडी रिपोर्ट दिल्याने पो.स्टे. बुट्टीबोरी येथे १) अप. क्र. २०७/२४ कलम ३७९ भादंवि २) अप. क्र. २२०/२४ कलम ४६१, ३८० भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये अनोळखी आरोपीचा शोध घेणे कामी घटणास्थळ परीसरातील असलेल्या सि.सि.टि.व्हि. कॅमेराची पाहणी करून व गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता वरीष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हयाचे तपासकामी विशेष पथक गठीत करून अनोळखी आरोपीचा शोध घेणे सुरू केले. गठीत पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय मुखबिर पेरून तसेच तांत्रीक बाबींचे सहाध्याने गुन्हयातील अनोळखी आरोपीचा शोध घेवून आरोपी नामे सुनिल रिखीराम राय वय ३९ वर्ष रा. चुनाभट्टी रोड बरघाट जि. शिवनी मध्यप्रदेश यास ताब्यात घेवून त्यास गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असुन सदर आरोपी कडुन अप, क्र. २०७/२४ कलम ३७९ भादवि गुन्हयातील २० क्विटल चना तसेच अप. क्र. २२०/२४ कलम ४६१, ३८० भादवि गुन्हयातील ६.५ क्विटल तूर व १.५ क्विटल गहू असा एकूण किंमती १,९९,२१५/- रु. चा धान्य माल व गुन्हयात वापरलेली बोलेरो पिकप गाडी क्र. एम. एच. २९/बी.ई.२१३५ किंमती ३,५०,०००/- रू व मोबाईल कि. ८०००/- रू. असा एकूण ५,५७,२१५/- रु. चा मुद्देमाल आरोपी कडून हस्तगत करण्यात आला.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड व पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांचे मार्गदर्शनाखाली गठीत विशेष पथकातील अधिकारी सपोनी प्रशांत लभाणे, सफी सुरेश धवराळ, पोहवा आशिष टेकाम, पोहवा प्रविण देव्हारे, पोहवा युनूस खान, पोहवा कृणाल पारधी, पोशि दशरथ घुगरे, पोशि आशिष कछवाह व पोशि माधव गुट्टे यांनी कामगिरी पार पाडली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सफौ सुरेश धवराळ हे करीत आहे.
बुटीबोरी पोलीसांकडून शेतकरी जनतेला आव्हाण आहे की, शेतीत काढलेला शेतमाल हा त्याच दिवशी सुरक्षीत ठिकाणी ठेवावा किंवा त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी व चोरांपासून सावध रहावे.