मुंबई :- ‘टायटन्स ऑफ फेअर बिझनेस प्रॅक्टिसेस’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे पार पडले.
लेखक विकेश वालिया यांनी पुस्तकाची पहिली प्रत राज्यपालांना भेट दिली. पुस्तकाचे प्रकाशन टाईम्स ऑफ इंडिया समूहातर्फे करण्यात आले आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला बजाज इलेक्ट्रिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक शेखर बजाज, सीएफबीपीचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील कोठारी, सीएफबीपीचे सह-संस्थापक विष्णू भाई हरिभक्ती, स्वर्ण कोहली, शैलेश हरिभक्ती, सीएफबीपी कार्यकारी समितीच्या सदस्या पायल कोठारी, सीएफबीपी सल्लागार मंडळाचे सदस्य सिद्धार्थ रैसुराना, सीएफबीपी प्रशासकीय समितीचे सदस्य निरंजन झुनझुनवाला व सुनिता वालिया उपस्थित होते.