– महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार अत्यंत सन्माननीय आहे.
नागपूर :- महाराष्ट्र भूषण कार्यक्रम सरकारी कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमात किती संख्या असावी हे सरकारने ठरवायचे असते जेवढे लोकसंख्या असेल त्याप्रमाणे बसायची तथा उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते. त्यात सावलीची पेंडालची व्यवस्था आवश्यक होती. लोक किती आणि केव्हा पासून आले त्याप्रमाणे व्यवस्था असायला पाहिजे होती. पण वरील कार्यक्रमात सर्व प्रकारच्या नियमाची पायमल्ली केली गेली. तरी वरील कार्यक्रमात 15 पेक्षा जास्त श्री सेवकांच्या मृत्यू झाला. आपण छोटीशी सभा घेतो तरी पोलीस खाते सर्व प्रकारचे नियमाला बांधून परवानगी देते. वरील कार्यक्रमात क्रेंद्रिय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा सरकारमधील काही कॅबिनेट मंत्री व आमदार उपस्थित होते. त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक होते. ज्यावेळेस अशी काही घटना होते तेव्हा आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल होतो. वरील कार्यक्रमाचे जबाबदार कोण?
करिता आपणास विनंती आहे की आपण सुमोतो घेऊन ज्यांनी ज्यांनी केलेली चूक पंधरा पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहे त्यांच्यावर कार्यवाही अपेक्षित आहे.
करिता आपणास विनंती आहे की सर्व बाबी तपासून जे दोषी आहेत त्यांच्यावर सदोष खुणाचा गुन्हा दाखल करावा.
यावेळी शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठ, शेखर सावरबंधे, अविनाश गोतमारे, प्रशांत पवार,श्रीकांत लक्ष्मी सावरकर, नूतन रेवतकर, संतोष सिंह, महेंद्र भांगे, राजा बेग, शैलेन्द्र तिवारी,देवेंद्र घडले, मिलिंद वाचनेकर, हर्षद विद्रोही, प्रशांत बनकर, आशुतोष बेलेकर, प्रणव मैसकर, अनिल बोकडे, विनय मुदलीयार, रुद्र धाकडे, नंदू माटे, मिलिंद महादेवकर, प्रशांत वैरागडे, राजु मिश्रा,पुरुषोत्तम वादिघरे, विजय सेनगावकर, नागेंद्र आठणकर, विजया रामटेके, संजय आग्रे, अर्शद अन्सारी, नसीम भाई, राजा खान, इस्रायल अन्सारी, अजहर पटेल, राणी डोंगरे, आकाश चिमणकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.