नागपूर :- दिनांक २६.०८.२०१९ ते दिनांक १४.०५.२०२३ चे दरम्यान पोलीस ठाणे बेलतरोडी हदीत राहणारी १९ वर्षीय फिर्यादीचे तीचे वस्तीत राहणारा आरोपी नामे संदीप भारत वर्मा वय २२ वर्ष यांचे सोबत ४ वर्षांपूर्वी पासुन ओळख होवुन त्याचात मैत्री होती. आरोपीने फिर्यादी मुलीस तो अल्पवयीन असल्याचा व मैत्रीचा फायदा घेवुन तीला लग्नाचे आमीष दाखवून तिचे इच्छेविरुध्द जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापीत केले. याबाबत कोणाला काहिही सांगीतल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने आरोपीस लग्नाबाबत विचारले असता आरोपीने नकार देवून तिचे सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे बेलतरोडी येथे पोउपनि डाखोरे यांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (२) (एन), ५०६ भा.दं.वि. सहकलम ४ पोक्सो कायदाअन्वये गुन्हा नोंदवून आरोपी यास अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.