जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी – जिल्हाधिकारी

गडचिरोली :- भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारे गडचिरोली जिल्ह्यात पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यातील विरळ ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस तसेच विरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

हवामान विभागाने दि. १८ जुलै, २०२४ करिता ऑरेंज अलर्ट तर दि. १९ जुलै रोजी रेड अलर्ट तसेच दिनांक २० जुलै, २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट बाबत इशारा दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तु, विद्युत खांब वा झाडाजवळ राहू नये, झाडाखाली आसरा घेवू नये. मुसळधार अति मुसळधार पाऊसामुळे नदी, नाले, ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकिना-यावरील गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये. तलाव / बंधारा / नदी इत्यादी ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी जाऊन सेल्फीच्या नादात जीव गमावण्याच्या घटना प्रामुख्याने दिसून येतात.

सबब सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नदी/ तलाव / बंधारे इत्यादी ठिकाणांजवळ उचित सतर्कता बाळगावी. सेल्फीचा मोह करु नये असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशालगढ पर अतिक्रमण के खिलाफ लड़ने वाले शिवप्रेमियों पर दर्ज मामले वापस लेने की हिंदू जनजागृति समिति की मुख्यमंत्री से मांग!

Fri Jul 19 , 2024
– किसी पर भी अन्यायपूर्ण कार्रवाई नहीं होने देंगे; साथ ही विशालगढ़ पर सभी अतिक्रमण हटाएंगे ! – मुख्यमंत्री का आश्वासन पंढरपुर (सोलापुर) :- विशालगढ़ पर अतिक्रमण के विरुद्ध आंदोलन करने वाले शिवप्रेमियों पर प्रशासन द्वारा अन्यायपूर्ण कार्रवाई करते हुए झूठे मामले दर्ज किए जा रहे हैं। इन मामलों को तुरंत वापस लेने की मांग हिंदू जनजागृति समिति के महाराष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com