संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– दुर्गा चौकातील थकबाकी दाराचे दुकान केले सील
कामठी :- कामठी नगर परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून कामठी नगर परिषदला प्राप्त विविध कर वसुलीतीन कामठी नगर परिषदचा कारभार सुरू करीत प्राप्त शासकीय निधीतून शहराच्या विकास करण्यात येतो तर स्थानिक मालमत्ता धारकाकडून मिळत असलेले’ कर ‘कामठी नगर परिषदच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे.यासाठी नागरिकांनी कामठी नगर परिषद च्या विविध कराचा भरणा करून नागरिकांनी कामठी नगर परिषदला सहकार्य करावे असे नेहमी आवाहन करण्यात येते तरीसुद्धा बहुधा नागरिकांकडून कामठी नगर परिषद प्रशासनाला अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने शहरातील विविध नागरिकावर कराची थकबाकी कायम आहे. या वर्षीचे आर्थिक वर्ष संपण्याच्या मार्गावर असून नवीन आर्थिक वर्षे लागणार आहे तरीसुद्धा येथील स्थानिक मालमत्ताधारकावर एक कोटीच्या वर कराची थकबाकी आहे.या कर वसुलीसाठी कामठी नगर परिषद प्रशासनाने कंबर कसली असून कामठी शहरातील मालमत्ता थकीत दाराविरुद्ध मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या नेतृत्वात थकीत कर वसुली पथक तयार केले असून थकीत कर आकारणी वसुलीला जोमात सुरुवात करण्यात आली असून दरम्यान आज दुर्गा चौकातील थकबाकीदार दुकांनदाराकडे थकीत कर वसुलीचा मोर्चा वळविला असता असलेल्या एका थकबाकीदार दुकानदाराने 84 हजार रुपये थकीत कराचा भरणा करण्यास प्रतिसाद न दिल्याने कर वसुली पथक निरीक्षक विजय मेथीयां, प्रदीप भोकरे,दीपक रेवतकर,रुपेश जैस्वाल,पल्लवी हुमने,धर्मेंद्र जैस्वाल यांनी या दुकानावर सीलबंद कारवाही केली.तर आज एकाच दिवसात राबविलेल्या कर वसुलीत 1 लक्ष 80 हजार रुपये वसुल करण्यात आले. इतर थकबाकीदारावर याप्रकारच्या सिलबंद कारवाहीचा बडगा न पडावा यासाठी थकीत मालमत्ता कराचा लवकरात लवकर भरणा करा असे आवाहन कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी संदीप बोरकर तसेच कर वसुली पथक निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां,प्रदीप भोकरे,दीपक रेवतकर,रुपेश जैस्वाल ,पल्लवी हुमने, धर्मेश जैस्वाल यांनी केले आहे.
-कर भरा नाही तर जप्तीची कारवाही सुरू
-कामठी नगर परिषद कर वसूली पथकाकडून कर वसुली पथक अधिक तीव्र केली असून कर वसुली पथक मैदानात उतरले आहेत कराचा भरणा करा नाही तर जप्तीची कारवाही होनार आहे.आता शनिवारी व रविवारी सुद्धा नगर परिषद कार्यालय सुरू ठवले जात आहे.