मालमत्ता व इतर कर ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे मुख्य साधन – सरपंच सरिता रंगारी 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- गावाच्या विकासासाठी व इतर दैनंदिन गरजेच्या पूर्ततेसाठी घरपट्टी,पाणीपट्टी व इतर कर हे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे मुख्य साधन असल्याने येरखेडा ग्रामवासीयांनी आपल्याकडील थकीत कराचा भरणा करून ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन येरखेडा ग्रामपंचायतच्या सरपंच सारिता रंगारी यांनी केले आहे.

ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग आहे तर घरपट्टी,पाणीपट्टी व इतरकर ग्रामपंचायत उत्पन्नाचे साधन आहेत.शासनामार्फत ग्रामपंचायतीला विविध योजनेचा निधी मिळतो मात्र तो गावातील विकासकामांवर खर्च होतो त्यामुळे ग्रामपंचायत अंतर्गत गावातील दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी कर वसुली हे एकमेव साधन आहे.त्यात गावात दररोज पाणीपूरवठा करणे,पाणीपूरवठा योजनेची दुरुस्ती,ब्लिचिंग पावडर खरेदी,विद्दुत बिलाचा भरणा,दिवाबत्ती कर्मचाऱ्यांचा पगार,गावातील स्वछता राखणे,नाली सफाई,किरकोळ दुरुस्ती, कार्यालयीन खर्च ,आरोग्य,शिक्षण व महिला व बालकल्याण यासारखी अनेक नित्याची व पूरक विकासाची कामे ग्रामपंचायतीला करावे लागते व ह्या कामासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळने आवश्यक आहे त्यामुळे मालमत्ता धारकांनी आपल्या कडील थकीत कराचा भरणा करून ग्रामपंचायतला सहकार्य करण्याचे आवाहन येरखेडा ग्रा प सरपंच सरिता रंगारी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येरखेडा येथे नारी न्याय संमेलन

Thu Mar 14 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- शिवपचायत मंदीर येरखेडा येथे जिल्हा महिला ग्रामीण कॉंग्रेस कमेटीच्याा वतीने नारी न्याय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुदा राउत, महिला कॉंग्रेस कमेटीच्या अनुराधा भोयर, पचायत समितीच्या सभापती दिशा चनकापुरे, येरखेडा ग्राम पंचायतच्या सरपंच सरिता रगारी यांच्या सह तालुक्यातील सीआरपी आशा स्वयंसेविका, आंगणवाडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com