महसूली कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल/ नवीन कार्यालय निर्मिती व महसूली कायद्यांमध्ये बदलांबाबत शिफारशी आमंत्रित

नागपूर :- राज्यातील महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फरबदल/ नवीन कार्यालये निर्मिती तसेच महसूली कायद्यांमध्ये आवश्यकतेनुसार बदलांबाबत शिफारशी करण्याकरिता उमाकांत दांगट यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीस सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बाबी, सामाजिक परिस्थितीत झालेला बदल व इतर अनुषंगिक बाबींमुळे महसूल कामकाजाशी संबंधित महत्वाच्या कायद्यांमध्ये कालानुरुप बदल करणे आवश्यक आहे किंवा कसे हे तपासून शासनास अहवाल सादर करावयाचा आहे.

त्या अनुषंगाने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947, महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 व त्याखालील नियम, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व त्याअंतर्गत असलेले नियम या कायद्यांमध्ये कालसुसंगत सुधारणा करण्याच्या अनुषंगाने आपल्या काही सूचना असतील तर गुरुवार दि.15 फेब्रुवारीपर्यंत महसूली कार्यालये पुनर्रचना व महसूल कायदे सुधारणा समितीच्या कार्यालयाकडे समक्ष/ पोस्टाव्दारे/ ईमेल द्वारे खालील पत्ता व ई-मेल आयडी वर पाठविण्यात याव्यात. तसेच ज्यांना सूचना समक्ष सादर करावयाच्या आहेत त्यांना शुक्रवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता सदस्य सचिव तथा उप आयुक्त (सामान्य प्रशासन), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे, विधानभवन, बंड गार्डन रोडे, पुणे तसेच ईमेल rev.reformcomt@gmail.com या पत्यावर समक्ष उपस्थित राहून समितीसमोर सादर कराव्या, असे समितीमार्फत कळविण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपा ,महायुती बळकट होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

Tue Feb 13 , 2024
– भाजपा प्रवेश पदाच्या अपेक्षेने नाही – अशोक चव्हाण मुम्बई:- ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष शेलार, खा. प्रतापराव चिखलीकर, ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील, आ. प्रवीण दरेकर, प्रदेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com