गौरव गैस एजन्सी कार्यालय पंधरा दिवसांपासून बंद

संदीप बलविर, प्रतिनिधी

– ग्राहकावर उपासमारीची वेळ

– सिलेंडर करिता ग्राहकांच्या रांगा

नागपूर :- बुटीबोरी म्हाडा वसाहतीत असलेले गौरव हिंदुस्थान पेट्रोलियम (एच पी) गॅस एजन्सीचे कार्यालय गत १५ दिवसांपासून बंद असल्याने ग्राहकांवर उपासमारीची पाळी आली असून ग्राहकांना उगाचच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक साधनांचा महिलांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता केंद्र सरकारने घरोघरी सिलेंडर आणि घरपोच पुरवठा करण्याचा मास्टर प्लान अवलंबविला असून चोवीस तासात घरपोच सेवा पुरविण्याची हमी असतांना बुटीबोरी येथील हिंदुस्थान पेट्रोलियम गैस च्या ग्राहकांवर मात्र सद्यस्थितित उपासमारीची वेळ आलेली आहे.

बुटीबोरी शहरात गौरव हिंदुस्थान पेट्रोलियम (एच पी)गैस एजंसी नामक वितरक आहे ज्यांच्याकडे जवळपास १० हजार ग्राहकांची नोंदणी आहे.दररोज त्यांच्याकडे कमीत कमी ३०६ सिलेंडर ची मागणी असते.परंतु वितरकाने गेल्या ०१ फेब्रूवारी पासून हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड कंपनिकडे सिलेंडर करिता पैसेच भरले नसल्याने व एजन्सी कार्यालयाला कुलूप बंद केल्याने ग्राहकांच्या मागणीची पूर्तता होत नसल्याचे येथील ग्राहकांनी सांगितले.

बुटीबोरी शहरात गैस ग्राहक हा कामगार वर्गातला असून यातील बरेच ग्राहक हे भाड्याच्या घरात राहत आहेत.घर मालकांकडून पारंपारिक इंधनाचा वापर करण्यास मनाई असल्याने शिवाय या ठिकाणी केरोसिन देखील उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांच्या उपजीवीकेचा प्रश्न आता आ वासुन उभा आहे.गॅस सिलेंडर करिता ग्राहक रोज मजुरी पाडून गॅस एजन्सी समोर दिवसभर कार्यालय उघडायची वाट बघत असतात.रोज मजुरी बुडवून सुद्धा सिलेंडर मिळत नसल्यामुळे आणखी किती दिवस उपाशी राहायचे अशी चिंता ग्राहक व्यक्त करीत आहे.

या गंभीर समश्येवर लवकरात लवकर तोड़गा काढावा याकरिता येथील भोळ्या भाबळ्या ग्राहकांनी पोलीस उपअधीक्षक यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

परसाड ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक रद्द

Wed Feb 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – 23 फेब्रुवारीला उपसरपंच पदाची फेरनिवडणूक होणार! कामठी :- नुकतेच 18 डिसेंबरला कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक पार पडली त्यानुसार थेट जनतेतून 27 सरपंच तर 93 प्रभागातून 247 सदस्यांची निवड करण्यात आली.यातील सदस्यमधून निवड करण्यात येणाऱ्या उपसरपंच पदाची निवडणूक तीन टप्प्यात 6 ,9 व 10 जानेवारी 2023 पार पडली .यातील परसाड ग्रा प च्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com