मुंबईतील डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा शिंदे-भाजपा सरकारचा निर्णय भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांची माहिती

मुंबई :- मुंबईमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणा-या डबेवाल्यांना परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचा निर्णय शिंदे- फडणवीस सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी गृहनिर्माण विभागाचे अधिकारी व डबेवाले संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती भाजपा नेते आ. श्रीकांत भारतीय यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डबेवाला ट्रस्ट अध्यक्ष उल्हास मुके, डबेवाला असोसिएशन अध्यक्ष रामदास करवंदे व भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

आ.भारतीय यांनी सांगितले की, १८९० पासून मुंबईमध्ये सेवा पुरवणाऱ्या डबेवाल्यांना मालकीची घरे मिळावीत, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. या बाबत आपण विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी फडणवीस यांनी डबेवाल्यांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. त्या नुसार आजच्या बैठकीचे आयोजन केले होते. म्हाडा, सिडको तसेच महसूल विभागाकडून जागा घेऊन डबेवाल्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

डबेवाल्यांना त्यांची सेवा देणे सोईस्कर होईल अशा ठिकाणी त्यांना घरे देण्यात येतील,असेही आ.भारतीय म्हणाले. डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्न शिंदे- भाजपा सरकारने अतिशय संवेदनशीलतेने हाताळला आणि मार्गी लावला त्याबद्दल आ. भारतीय यांनी फडणवीस यांचे आभार मानले. डबेवाल्यांना त्यांच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी उपयुक्त असलेले मुंबई डबेवाला भवन हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आ. भारतीय म्हणाले.

NewsToday24x7

Next Post

मुंबईच्या डबेवाले कामगारांच्या घरकुलांसाठी धोरण लवकरच - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sat Jun 10 , 2023
मुंबई :- मुंबई डबेवाले कामगार यांच्यासाठी घरकुले उपलब्ध करून देण्यासंदर्भात लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेघदूत निवासस्थान येथे मुंबई डबेवाले कामगार यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी आमदार श्रीकांत भारतीय, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, नूतन मुंबई टिफीन […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com