भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन

पुणे :- भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आर्थिक साक्षरता सप्ताह राबविण्यात येत असतो. त्याचाच भाग म्हणून भारतीय रिझर्व बँक, जिल्हा अग्रणी बँक व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोणावळा येथे विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताह अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय रिझर्व बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक सुभान बाशा, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक प्रवीण नलावडे, जिल्हा अग्रणी बँकेचे पी.एस.सरडे, लोणावळा शाखा व्यवस्थापक राकेश कुमार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोणावळाच्या प्राचार्या प्रतिभा चव्हाण- शिंदे आदी उपस्थित होते.

यावर्षीच्या सप्ताहाची संकल्पना ‘योग्य सुरुवात करा – वित्तीय स्मार्ट बना’ अशी ठेवण्यात आलेली आहे. या सप्ताहाअंतर्गत विद्यार्थ्यांना बचत आणि चक्रवाढीची शक्ती, विद्यार्थ्यांसाठी बँकिंग सुविधा तसेच डिजिटल व सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कौशल्य शिक्षणानंतर उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या कर्ज योजनांची माहितीही देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात बदल

Wed Feb 28 , 2024
पुणे :- यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पातील वळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने खोपोली बाह्यमार्गात मुंबई वाहिनीवर सोमवारपासून बदल करण्यात आला आहे, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे. नव्या बदलानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने खोपोली गावाकडे जाण्यासाठी हलक्या व जड अवजड वाहनांनी मुंबई वाहिनीच्या उजव्या बाजूच्या दोन लेनमध्ये तर मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या बाजूच्या तीन लेनमध्ये वाहतूक करावी. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights