मुंबई :- महाराष्ट्राचे नामनिर्देशित राज्यपाल रमेश बैस व रामबाई यांचे राजभवन मुंबई येथे आगमन झाले.
राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, सहसचिव श्वेता सिंघल व प्राची जांभेकर तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी राज्यपालांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. रमेश बैस दिनांक १८ फेब्रुवारी रोजी राज्यपाल पदाची शपथ घेत आहेत.