270 रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 8 :-रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे तेव्हा रक्तदान एक चळवळ समजून स्वेच्छेने रक्तदान करावे असे आवाहन युवक कांग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांनी अली ग्रुपच्या वतीने कामठी येथील हैदरी चौकात मोहरमच्या पर्वावर आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले .

    याप्रसंगी युवक कांग्रेस चे पदाधिकारी इरशाद शेख, संदीप जैन तसेच अली ग्रुप चे कामराण जाफरी आदी उपस्थित होते. अली ग्रुपच्या वतीने मोहरमच्या पर्वावर हैदरी चौकात आयोजित रक्तदान शिबिरात 270 रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.या रक्तदान शिबिराला तिरपुडे ब्लड बँक सेंटरचे पियुष भट ,डॉ निकिता जोगी, डॉ विना वाघ, नवसाद अहमद अंकिता सांगोळे ,प्रियंका वाडीभस्मे यांनी रक्त संकलन केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!