महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे.

शरद पवारांनी सुनावणीला स्वत: हजेरी लावूनही पक्ष हातून गेला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: हजेरी लावताना बघायला मिळाले. याशिवाय त्यांच्या गटाचे दिग्गज नेते या सुनावणीला हजर राहत होते. निवडणूक आयोग शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल, असा अंदाज बांधला जात होता. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत. याशिवाय ते प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल? याबाबत उत्सुकता होती. पण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निकालासारखाच निकाल दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घड्याळाचे काटे फिरले… चिन्ह गेलं, पक्ष गेला; शरद पवार यांच्याकडे पर्याय काय?

Wed Feb 7 , 2024
मुंबई :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या 63 वर्षाच्या राजकारणातील शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला आहे. तसेच चिन्हही गेलं आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे आणि केलेले युक्तिवाद यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com