संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 14 एप्रिल निमित्त शांतता समितीची बैठक
कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वा जयंती सोहळा उत्साहात साजरी होत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे तसेच लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही ही दक्षता घेण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाच्या वतीने काल 12 एप्रिल ला जयस्तंभ चौक स्थित संत कबीर वाचनालयात एसीपी विशाल क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शांतता समिती ची बैठक यशस्वीरीत्या पार पडली.याप्रसंगी ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे, गुप्त विभागाचे अखिलेश ठाकूर, शैलेश यादव आदी उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी असलेले एसीपी विशाल क्षीरसागर यांनी सांगितले की 14 एप्रिल ला शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक प्रयत्न करीत आहे.नागरिकानी सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे,तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वैफल्य संदेश पोहोचणार नाहीत अशी दक्षता घ्यावी.
यावेळी मिरवणुकी दरम्यान येणाऱ्या प्रमुख अडचणी भारनियमन, वाहतूक व्यवस्था,सुरक्षा व्यवस्था,ध्वनीच्या आवाजाची तीव्रता,इत्यादी विषयावर उपस्थित जागरूक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले.