– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई
भिवापूर :- पो, स्टे. भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग व वाहतूक केसेस करीत असताना नीलज फाट्याकडून भिवापूरकडे १० चक्का टिप्पर ट्रक क्र. MH-36/AA- 2182 व टिप्पर ट्रक क्र. MH-40/BL-1649 हे येताना दिसले त्यांचा पाठलाग करून भिवापूर बस स्टॅन्ड समोर भिवापूर येथे थांबवून पाहणी केली असता त्यामध्ये दोन्ही टुक मध्ये अंदाजे ०६ ब्रास रेती मिळून आल्याने दोन्ही ट्रक चालकास सदर ट्रक मधील रेतीचे रॉयल्टी बाबत विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती ही चोरीची असल्याची खात्री झाल्याने टिप्पर क्र. MH-36/AA-2182 किंमती २५,००,०००/-रू. व त्यामध्ये ०६ ब्रास रेती किंमती ३०,०००/- रू. व टिप्पर क्र. MH-40/BL-1649 किंमती २५,००,०००/- रू. व त्यामध्ये रेती ०६ ब्रास किंमती ३०,०००/-रू, असा दोन्ही मिळून एकूण ५०,६०,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करून सदर टिप्पर क्र. MH-36/AA-2182 चा चालक आरोपी नामे १) नवनाथ राजकुमार कांबळे, वय २७ वर्ष, रा. गुडेगाव ता. पवनी २) मालक दिनेश सावरबांचे, रा. आसगाव ३) टिप्पर क्र. MH-40/BL-1649 या चालक महेश नत्थुजी सडमेक, वय ३१ वर्ष, रा. उरी ता. उमरेड जि. नागपूर ४) सुशांत भोयर, रा. नागपूर यांचेविरुद्ध कलम ३७९, १०९ भा.द.वी. सहकलम ४८ (७), ४८(८) महा. ज. म. स. सहकलम ४, २१ खाणी आणि खनिजे अधी. १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो.स्टे. भिवापूर येथे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोहार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक डॉ. सदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार स. पो. नि. प्रमोद चौधरी, सहायक फौजदार ठाकूर, पोलीस हवालदार किशोरसिंग ठाकूर राकेश त्रिपाठी, पोलीस अंमलदार मिलिंद राठोड, रवी वानखेडे, चालक पोलीस हवालदार बांते यांनी केली.