रा.तु.म. नागपूर विद्यापीठ बॉक्सिंग संघात निशांत यादव यांची निवड

नागपूर :-नुकत्याच झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेमध्ये इंदिरा गांधी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपूर या महाविद्यालयातील बी.पी.एड.-द्वितीय वर्षाचा विद्यार्थी निशांत यादव याने 80 ते 86 किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त करून नागपूर विद्यापीठाच्या संघात आपले नाव पक्के केले. पुढील महिन्यात दि. 02/01/2022 पासून रोहतक येथे सुरू होणार्‍या अखिल भारतीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये निशांत यादव भाग घेणार आहे.

महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभात संस्थेचे संस्थापक अरूण जोशी यांनी पुष्पगुच्छ व ट्रॅक शुट देऊन निशांत यादव याचा सत्कार केला व त्याला पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदीप घोष, डॉ. बाबुलाल धोत्रे, डॉ. दत्तात्रय करांगळे, डॉ. रमेश बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र विधानसभा के शीतकालीन सत्र के लिए नागपुर में कड़ी सुरक्षा..

Sun Dec 18 , 2022
नागपुर : नागपुर में सोमवार से शुरू हो रहे महाराष्ट्र विधानमंडल के शीतकालीन सत्र को सुचारू रूप से संपन्न कराने के लिए करीब 7,000 पुलिसकर्मियों को तैनात किया जाएगा. अधिकारियों ने शनिवार को यह जानकारी दी. नागपुर के पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने कहा कि सत्र के दौरान कोई अप्रिय घटना नहीं हो इसके लिए पुलिस पूरी तरह मुस्तैद है. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com