विविध संघटनांचा ना. गडकरी यांना पाठिंबा

नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीसाठी विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. इंडियन अनएम्प्लॉइड इंजिनियर्स असोसिएशन, क्षत्रिय करणी सेना आणि भारतीय रिअलटर्स असोसिएशन या संघटनांनी पत्राद्वारे आपले समर्थन कळविले आहे.

‘आपण नागपूरसह संपूर्ण भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अतुलनीय कामगिरी केल्यामुळे नागपूरचे आणि देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे आपणास जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे,’ असे पत्र भारतीय रिअलटर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष शरद देशमुख, सचिव वैशाली खंते, कार्याध्यक्ष सीमा रानडे व सर्व कार्यकारीणी सदस्यांनी दिले आहे. क्षत्रीय करणी सेनेचे राष्ट्रीय प्रवक्ते व संघटन महामंत्री सुरजसिंह ठाकूर यांनी पाठिंब्याचे पत्र देतानाच ना. गडकरी यांना दमदार विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इंडियन अनएम्प्लॉइड इंजिनियर्स असोसिएशनचे अनिल बुर्रेवार आणि शकीर अब्बास अली यांनी समर्थन जाहीर केले आहे. ‘आपल्या कामांचा धडाका व रोजगार निर्मितीसाठी आपण करीत असलेली धडपड लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने आपल्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन अनएम्प्लॉइड इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आम्ही आपल्याला समर्थन देत आहोत,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुन्हा धक्का, बर्वेचे जिप सदस्यत्वही रद्द

Wed Apr 3 , 2024
– विभागीय आयुक्तांचा आदेश : काँग्रेसमध्ये खळबळ, सुनील साळवे यांनी दिला कारवाईचा अर्ज  नागपूर :- जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांना धक्क्यांमागून धक्के सहन करावे लागत आहेत. जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यापाठोपाठ रामटेकसाठी दाखल उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयातही त्यांना दिलासा मिळू शकला नाही. उच्च न्यायालयातही याचिकेवर सुनावणी सुरू होऊ शकली नाही. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights