नागपूर – दिनांक 19.04.2023 रोजी मा. अति. सह जिल्हा न्यायाधीश तथा अति. सत्र न्यायाधीश कोर्ट क्र. 12, श्री. आर.आर भोसले साहेब, यांनी त्यांचे कोर्टाचे केस क्र 271/2019 मधील पो. ठाणे नंदनवन येथील, अप.क्र. 659/2019 कलम 363, 354(अ), 376(2)(जे) भादवि सहकलम 4, 12 पोक्सो, या गुन्हयातील आरोपी शुभम उर्फ सत्यनारायण रामलाल भंडारी वय 21 वर्ष, रा. प्लॉट न. 12, बेलदार नगर, नरसाळा रोड, नागपुर, याचे विरूध्द साक्षी पुरावाअंती गुन्हा शाबीत झाल्याने आरोपीस कलम 366 भा.दं.वि. मध्ये 05 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 5,000/ रू दंड व दंड न भरल्यास 5 महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम 354(अ) भा.दं.वि. मध्ये 01 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 1,000/ रू दंड व दंड न भरल्यास 01 महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम 376(2)(जे) भा.दं.वि. मध्ये 10 सश्रम कारावासाची शिक्षा व 6,000/ रू दंड व दंड न भरल्यास 05 महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा, तसेच कलम 4, पोक्सो मध्ये 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 6,000/ रू दंड व दंड न भरल्यास 05 महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा तसेच कलम 12, पोक्सो मध्ये 03 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 3,000/ रू दंड व दंड न भरल्यास 03 महिने अतिरिक्त कारावासाचीशिक्षा तसेच कलम 506 भा.दं.वि. मध्ये 02 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व 1,500/ रू दंड व दंड न भरल्यास 02 महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली.
दिनांक. 23.08.2019 चे 17.00 वा. ते 17.30 वा. चे दरम्यान पो.ठाणे नंदनवन हद्दीत राहणारे 42 वर्षीय फिर्यादी यांची 17 वर्षीय अल्पवयीन भाची ही घरी कोणाला काहिही न सांगता निघुन गेली तिला कोणीतरी अज्ञात ईसमाने फुस लावुन पळवुन नेले. फिर्यादीचे असे रिपोर्ट वरून पो. ठाणे नंदनवन येथे कलम 363 भा.दं.वी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासा दरम्यान पिडीत फिर्यादीची मुलगी मिळुन आल्याने व वैद्यकीय अहवालावरून सदर गुन्हयात कलम 354(अ), 376(2)(जे) भादवि सहकलम 4, 12 पोक्सो वाढ करून आरोपीला दिनांक 29.08.2019 चे 11.20 वा अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी मसपोउपनि स्नेहलता जायभाये, यांनी मा. कोर्टात तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून अॅड गवळी मॅडम यांनी तर आरोपी तर्फे अॅड चेतन ठाकुर यांनी काम पाहिले. सदर गुन्हयात कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि संजय यादव, पोहवा प्रमोद यावले यांनी काम पाहिले.