शेतकरी कष्टकरी महासंघाची टेकाडी ला जनजागृती संवाद संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- जवळच पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख) गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जन जागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहभागी होऊन सहकार्य करण्याची हमी दिली.

आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करित असुन कृषी प्रदान देशात शेतकरी दैना अवस्थेत येऊन पोहचाला तरी कुणीही शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर बोलताना दिसत नसल्याने रामटेक लोकसभेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतुत्वात ” शेतकरी कष्टकरी महासंघाची स्थापना करून पहिल्या टप्यात नागपुर जिल्हा व रामटेक लोकसभा अंतर्गत ग्रामिण भागातील गावा मध्ये शेतक-यांच्या भेटी, संवाद सभा व बैठकी घेऊन हितगुज करित जनजागृती कार्यक्रमांतर्गत पारशिवनी तालुक्यातील टेकाडी (को.ख) गावातील श्री हनुमान मंदीराच्या आवारात माजी खासदार प्रकाश जाधव, डॉ वराडे, नरेश बर्वे, सरपंच विनोद इनवाते, ग्रा प सदस्या ताकेश्वरी मोरे, अर्चना वासाडे, शितल सातपैसे, कोठीराम चकोले, दिलीप राईकवार आदिच्या प्रमुख उपस्थित गावातील शेतक-याशी संवाद साधुन जनजागृती करण्यात आली.

आपल्या भारत देशात झालेली कृषी क्रांती प्रत्यक्ष अमलात आणण्याकरिता आता फक्त लढाई फक्त पोशिंद्यासाठीच करायची असुन जोपर्यंत शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतीला कृषी एक्स प्रेस फिडरने नियमित विज पुरवठा करून विधृत मिटर लावुन विधृत बिल घेण्यात येत नाही. पेंच धरण शेत क-याकरिता असुन सुध्दा जिल्हयातील शेतीला फक्त ५ ते १० टक्के पाणी मिळते, त्यामुळे मुबलक पाणी सिंचनाकरिता मिळावे. शेत विमा, शेतक-याना हक्का चे न्याय मिळण्यास विशेष शेतकरी न्यायालयाची स्था पना व्हावी. राज्य व केंद्रात शिक्षक, पदविधर, सांस्कृ तिक जनप्रतिनिधीची जशी निवड होते, त्याच प्रमाणे शेतक-यांचे जनप्रतिनिधीची सुध्दा निवड करण्यात यावी. या सर्व शेतकरी, कष्टक-यांच्या न्याय हिताच्या बाबी पुर्ण करण्याकरिता शेतक-यांना एकत्र एकसंघ करून एक नवी चळवळ उभी करित शेतकऱ्यांवरील समुळ अन्याय नष्ट करे पर्यंत आत्ता थांबणे नाही. असे प्रखर संबोधन प्रकाश  जाधव हयानी केल्याने येथिल शेतक-यात नवचैत्यण निर्माण होत गावकरी शेतक-यानी उत्सफुर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हिता र्थ लढयात सहकार्य व सहभागी होण्याची हमी दिली.

या संवाद बैठकीस पंढरी बाळबुधे, धनराज राऊत, वसंतराव कांबळे,सचिन भोयर, नाना कांबळे, सुरेश हुड, श्याम आकोटकर, मनोज गुरधे, देवेंद्र सिंह सेंगर, बाळु सातपैसे, रामकृष्णा हुड, भुजंग आकोटकर, गणेश कांबळे, अशोक वासाडे, भालेराव उमप, दिनेश सातपैसे, शामराव सावरकर, सुरेश खोरे, शामराव मरघडे, सुर्यभान कुंभलकर, बंडु इंगळे, शैलेश सातपैसे, पुंडलिक राऊत, महादेव सातपैसे, विशाधर कांबळे, बळीराम सातपैसे, गोपीचंद गुरधे, दिनेश सातपैसे, नथुजी मोहाडे, मुलचंद सातपैसे, रविंद्र मोरे, मुकेश सेलोकर, मधुकर हुड, विशाल राऊत, बबलु उमाळे, गजानन बोरघरे, प्रज्वल गाडबैल, सुशांत डेंगे, संजय भोयर आदी सह शेतकरी, गावकरी उपस्थित उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुप्रीम कोर्ट ने बाबा रामदेव पतंजलि कंपनी को लगाई फटकार

Wed Feb 28 , 2024
देश को धोखे में रखा सुप्रीम कोर्ट का पतंजलि के विज्ञापनों पर बैन.. दिल्ली – सुप्रीम कोर्ट ने ‘झूठे और भ्रामक’ विज्ञापनों के लिए बाबा रामदेव और पतंजलि को कड़ी फटकार लगाई है। सुप्रीम कोर्ट ने पतंजलि के विज्ञापनों पर पूर्ण प्रतिबंध लगा दिया।पतंजलि और आचार्य बालकृष्णन को कोर्ट की अवमानना का नोटिस भी जारी किया गया है । नोटिस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com