हिंगणा :- निलडोह नगर पंचायत क्षेत्रात नायलॉन मांजा बंदी मोहीम राबविण्यात आली असून परिसरातील विविध दुकान, विक्रेते यांना भेट देण्यात आली. काही दुकानात नायलॉन मांजा सापडल्याने त्याची जप्ती करण्यात आली. आज निलडोह नगर पंचायत कडून अधिकारी व कर्मचाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली. संपूर्ण बाजारपेठ व गावात नायलॉन मांजा च्या वापरावर पूर्णपणे बंदी असल्याने कोणत्याही परिस्थितीत त्याची विक्री किंवा वापर न करण्याचे तसेच नागरिकांनी सुद्धा तो खरेदी करू नये व कुणी विक्री करताना आढळल्यास याची माहिती नगर पंचायत कार्यालयात देण्याचे आवाहन मुख्याधिकारी योगिता डांगरे यांनी केले आहे.
नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात निलडोह नगर पंचायत रस्त्यावर…
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com